विमानतळ अपघाती अग्निशमन वाहन
विमानतळ धडक अग्निशमन वाहन हे विमानतळावर वापरण्यात येणारे विशेष प्रकारचे अग्निशमन वाहन असते. एखाद्या विमानतळावर, विमानांच्या आवागमनाच्या प्रकारानुसार, हे तैनात करण्यात येते. या प्रकारच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक प्रकारच्या अग्निशमन अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्याते येतो. विमानास किंवा विमानतळावर लागलेल्या आगीत हे असे वाहन अग्निशमनात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यायोगे, बरीच जीव व वित्तहानी टळू शकते.[१]
वर्णन
[संपादन]हे अतिशय अजस्त्र व ताकदवार यंत्र/वाहन असते. यात, इतर यंत्रचलित वाहनांपेक्षा जास्त जलदरित्या त्वरण मिळू शकते, ज्याने ईच्छित स्थळी पोचण्याचा कालावधी कमीतकमी करता येतो. या प्रकारच्या अजस्त्र वाहनात, विमानतळाबाहेरही अत्यंत खडबडीत अशा भूमीवर अथवा रस्त्यांवर सहजतेने चालण्याची क्षमता असते.
याची, अग्निशमनासाठी पाणी, फोम, अग्निविरोधी रसायने इत्यादी धारण करण्याची क्षमता इतर अग्निशमन वाहनांच्या तुलनेत बरीच जास्त असते. यातील पाणी, फोम इत्यादी मारा करणाऱ्या पंपांची क्षमताही इतर वाहनांपेक्षा बरीच जास्त असते. यात जल-तोफ (वॉटर कॅनन) बसविलेली असते ज्याची क्षमता बरेच दुरवर मारा करण्याची असते.
मानके
[संपादन]नागरी विमानतळांवर आंतरराष्ट्रीय नागरी विमानन संघटना ही याबाबत आवश्यक असणारी किमान मानके ठरविते व काय-काय पद्धती आणि प्रथा वापरायच्या त्याचे निर्देशन करते. राष्ट्रीय नागरी विमानन संस्था त्यांचे देशात याव्यतिरिक्त काय मानके ठरवायचीत हेही निश्चित करु शकते.
विमानतळ धडक अग्निशमन वाहनांचे प्रकार
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ तरुण भारत, नागपूर ,ई-पेपर,आपलं नागपूर पुरवणी पान क्र. ११ नागपूर विमानतळावर एअरफिल्ड क्रॅश फायर टेंडर Check
|दुवा=
value (सहाय्य). दि. ०९/०२/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)