विद्या सुर्वे बोरसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साचा:विद्या सुर्वे बोरसे
जन्म ०५ जानेवारी १९७९
धुळे
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
साहित्य प्रकार बाल साहित्य, भाषांतर, समीक्षा
विषय मराठी साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती बालसाहित्यः आकलन आणि समीक्षा
वडील फकीरा सुर्वे
पती डॉ. सुभाष बोरसे
अपत्ये वेदांत, आदित्यराज

विद्या सुर्वे बोरसे (जन्म ५ जानेवारी १९७९) या मराठी लेखिका आहेत. बाल साहित्य, भाषांतर, अनुवाद, समीक्षा या क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. मालेगाव, नाशिक जिल्हा येथील महाराज सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापक आहेत. समीक्षक, बालसाहित्यिक, अनुवादक म्हणुन त्यांची ओळख आहे. शिवाय धुळे जिल्हा येथील वेल्हाणे देवाचे या गावच्या त्या सरपंच आहेत.

बालसाहित्यः आकलन आणि समीक्षा हा विद्या सुर्वे यांचा ग्रंथ प्रकाशित असून त्याला स्नेहसागर बालसाहित्य पुरस्कारासहित इतर दोन साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रकाशित लेखन[संपादन]

प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांची एकुण नऊ पुस्तके प्रकाशित आहेत. 'बालसाहित्यः आकलन आणि समीक्षा' हा बालवाचकांसाठीचा ग्रंथ प्रमुख असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहीलेला हा मराठीतील पहिला समीक्षा ग्रंथ आहे. इतर आठ पुस्तके ही पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरती मराठी भाषा व साहित्याचे अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.

बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या कवितांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. किशोर (मासिक) मध्ये त्यांनी ''वाचनानंद'' हे सदर चालवले. शालेय मुलांना या सदरामुळे विविध ग्रंथांचा परिचय झाला.

इतर[संपादन]

विद्या सुर्वे यांचे पंधरा संशोधनात्मक लेख प्रकाशित आहेत. साहित्य अकादमी सहीत अनेक महत्वाच्या संस्थांच्या चर्चासत्रांमध्ये त्यांनी शोधनिबंधवाचन केले आहे. मराठी नवकादंबरी या विषयावरती त्यांचे विशेष संशोधन आहे. काव्याग्रह या नियतकालिकाच्या संपादक मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. काव्याग्रह हे कवितेसाठीचे मराठी नियतकालिक असून मराठीसोबतच ते हिंदी आणि इंग्रजी भाषेतही स्वतंत्रपणे प्रकाशित होते.

बाह्य दुवे[संपादन]

http://prahaar.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/ http://kasmademedia.com/view_news.php?news_id=817 http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5571663678289507691&SectionId=13&SectionName=%C3%A0%C2%A4%E2%80%B0%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%20%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%B0 http://www.mulshidinank.com/2016/03/blog-post_47.html