विक्रम चंद्रा (पत्रकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रम चंद्रा (७ जानेवारी, १९६७:दिल्ली, भारत - ) हा एक भारतीय पत्रकार आहे, ज्याने एडिटरजी टेक्नॉलॉजीज या बहुभाषिक व्हिडियो बातमी प्लॅटफॉर्मची स्थापना केली.[१][२]

मागील जीवन आणि कारकीर्द[संपादन]

विक्रम चंद्राची आई नंदिनी चंद्रा हिंदुस्तान टाइम्सची पत्रकार होती. ती दून स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. विक्रम चंद्रा यांचे वडील योगेश चंद्रा आयएएस अधिकारी होते. विक्रम चंद्रा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यांनी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी स्टॅनफर्ड विद्यापीठात मास मीडियाचा अभ्यास केला.[३]

चंद्रा यांनी १९९१ मध्ये न्यूझट्रॅक नावाच्या दूरचित्रवाणी बातमीपत्रात काम करून दूरचित्रवाणी पत्रकारितेमध्ये कारकीर्द सुरू केली. ते १९९४ पासून नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमध्ये आहेत. द बिग फाइट या पुरस्कारप्राप्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते करतात.[४]

पुरस्कार[संपादन]

  • २००७ मध्ये, जागतिक आर्थिक मंचाकडून ग्लोबल लीडर फॉर टुमॉरो
  • सर्वोत्कृष्ट सूत्रसंचलानासाठी हिरो होंडा इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार
  • संवादासाठी शिक्षक उपलब्धी पुरस्कार.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "RP-Sanjiv Goenka Group acquires 51% stake in Vikram Chandra's Editorji". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2020-07-15. 2021-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ "A nose for news - Mehnaz Nasreen and Rohit Manchanda - The Sunday Indian". www.thesundayindian.com. Archived from the original on 2018-03-11. 2021-09-16 रोजी पाहिले.
  3. ^ "Vikram Chandra to launch Editorji, his new startup - Exchange4media". Indian Advertising Media & Marketing News – exchange4media (इंग्रजी भाषेत). 2021-09-16 रोजी पाहिले.
  4. ^ Sangghvi, Malavika (2011-08-13). "My Life My Style: Vikram Chandra, CEO of NDTV".