विकिपीडिया चर्चा:सदर/२०२३०४१५
Appearance
एप्रिल २०२३ मुखपृष्ठ सदर
[संपादन]@संतोष गोरे, Sandesh9822, Tiven2240, आणि Usernamekiran:,
हे सदर १५ एप्रिल रोजी मुखपृष्ठावर प्रकाशित होईल. मागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता लगेचच या लेखात तसेच याला लागून असलेल्या लेखात तसेच्या अशा लेखांच्या चर्चापानांवर सूचना, टिप्पणी, वादावादी आणि हमरीतुमरी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. तरी पुढील काही दिवस (तरी) नवीन बदलांवर अधिक लक्ष देण्याची विनंती.
अशा ठिकाणी सदस्यांनी असभ्यपणा केल्यास त्यांच्यावर तात्पुरता लगाम घालण्यास कचरू नये. यात --
- शिवीगाळ करणे
- धमक्या देणे
- निरर्थक वाद घालणे
- विनंती, सूचना देउन सुद्धा इतर सदस्यांना तसेच प्रचालकांना न जुमानणे
या प्रकारच्या अनेक वागणूकी असू शकतात. त्यांवर कठोर नजर असावी आणि प्रचालक म्हणून योग्य तेथे हस्तक्षेप करावा तसेच प्रसंगी योग्यी अशी कारवाई करावी.
धन्यवाद.