विकिपीडिया चर्चा:लेख संपादन स्पर्धा
मुखपृष्ठावर स्पर्धेची माहिती
[संपादन]मंडळी,
"विकिपीडिया लेख संपादन स्पर्धा" उत्कृष्ट कल्पना असून जर त्याद्वारे विकिपीडियावरील मजकूरांची व्याप्ती व दर्जा वाढवता आला तर आम्हा ज्ञानार्तांना त्याहून वेगळे काय हवे आहे? तेव्हा प्रथमतः कल्पनेचे मनःपूर्वक स्वागत.
सध्यापूरती सूचलेली एक छोटीशी सूचना : या स्पर्धेकडे जास्तीत जास्त संपादक व वाचक आकर्षित व्हावेत यासाठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर देखील स्पर्धेचा अल्पसा परिचय व तिच्या नियमावलींची माहिती देणार्या पानाचा दुवा ठेवायला हरकत नाही.
श्रीहरि ०६:२६, २४ नोव्हेंबर २००७ (UTC)
- मुखपृष्ठावर ही बातमी पाहिजेच, परंतु त्याआधी जर का आपल्याला त्याची रुपरेषा ठरवता आली तर उत्तम.
- २-३ दिवसांत हे होईल असा अदमास आहे.
- अभय नातू ०९:३१, २४ नोव्हेंबर २००७ (UTC)
बक्षिस
[संपादन]स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस काय मिळेल?
- काही खास विकि-पदके
- मुखपृष्ठावर वेगळे सदर करून तेथे स्पर्धेतील विजेते लेख दाखवले जातील
- की काही इतर योजना आहे?
- कोल्हापुरी ०४:२२, २८ नोव्हेंबर २००७ (UTC)
- तिन्ही.
- प्रत्येक विजेत्यास खास विकि-पदक देण्यात येईल. त्याशिवाय प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासही वेगळे विकि-पदक असेल.
- विजेते लेख पुढील काही महिन्यांचे मुखपृष्ठ सदर होतील.
- केदार सोमण यांच्या माहितीनुसार एका मराठी साप्ताहिकानेही विकिपीडियाला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे, तरी विजेत्यांना ऑफ-लाईन प्रसिद्धी देखील मिळण्याची शक्यता आहे.
- विकिपीडिया हा पूर्णतः स्वयंसेवकांच्या हिमतीवर चाललेला असल्यामुळे (सध्यातरी) रोख किंवा इतर बक्षिसे देण्याचे शक्य नाही.
- अजूनही काही योजना असल्यास येथे सुचवाव्यात.
- अभय नातू ०५:३८, २८ नोव्हेंबर २००७ (UTC)
मराठीत
[संपादन]स्पर्धेचे नियम व इतर माहिती मराठीत देता येईल का? आम्ही काही स्वयंसेवकांनी सुरुवात करावी का? mi majha... ०६:१७, २८ नोव्हेंबर २००७ (UTC)
अनुवाद
[संपादन]या लेखाचा अनुवाद केला आहे. तपासुन त्यात आवश्यक ते बदल करावे ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०४:५१, १३ फेब्रुवारी २०१० (UTC)
वेळा पत्रक
[संपादन]स्पर्धाची रुपरेषा बरोबर स्पर्धाचे वेळा पत्रक ही तयार करावे. सध्या स्पर्धा कुठल्या अवस्तेत आहे?--Shivcharan १०:५६, २४ मार्च २०१० (UTC)