विकिपीडिया चर्चा:दशकपूर्ती कार्यक्रम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दशकपूर्ती कार्यक्रम[संपादन]

छान कल्पना आहे. काही मदत लागल्यास कळवावे. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०७:२१, ११ जून २०१२ (IST)[reply]

उत्तम कल्पना. माझा सम्पूर्ण पाठिंबा.... Mvkulkarni23 ११:१५, ११ जून २०१२ (IST)

उत्तम प्रकल्प[संपादन]

उत्तम कार्यक्रम. या कार्यक्रमास शुभेच्छा. मला सहभागी व्हायला आवडेल. मी काही गोष्टी सूचवू इच्छितो.

१. या कार्यक्रमात विकिपिडियाचे जास्तीत जास्त संपादक सहभागी होतील, हे आयोजन समितीने पाहावे.

२. विकिपिडियावर संपादनाचे काम करणारे बहुतांश लोक हे आपापल्या क्षेत्रातील जाणते आहेत. अनेक लोक तर उत्तम लेखक आहेत. अनेक जण पत्रकार आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान राहील, हे पाहिले जावे, असे मला वाटते.

३. कार्यक्रमात एक खुले सत्र ठेवावे. ज्यायोगे इच्छा असलेल्या कोणालाही आपले विचार मांडता येऊ शकतील.

सूर्यकांत पळसकर , 14 jun 2012.

दूर आहे[संपादन]

१ में २०१३ फार दूर आहे असे नाही का वाटत? आभिजीत १०:३०, ११ जून २०१२ (IST)[reply]

कार्यक्रम "जास्तीत जास्त उत्तम" व्हावा म्हणून नियोजन आता सुरू करणे योग्य वाटते. AbhiSuryawanshi (चर्चा) ११:४०, ११ जून २०१२ (IST)[reply]
मला नीट कळले नव्हते. दशकपूर्ती असल्याने तारीख आपोआप ठरली आहे हे माझ्या लक्षातच आले नाही. आभिजीत २१:३५, १३ जून २०१२ (IST)[reply]
3 महीने बाकी :-) AbhiSuryawanshi (चर्चा) २०:२६, २९ जानेवारी २०१३ (IST)[reply]

वेबकास्ट[संपादन]

या कार्यक्रमाचे यूट्युब किंवा तत्सम माध्यमातून जगभर प्रसारण करता येते. गूगलशी संपर्क साधला असता ते अशा कार्यक्रमांसाठी वेगळे चॅनल तयार करुन देऊ शकतात. ही सुविधा अल्पमूल्यात किंवा मोफतही असते. काही महिने आधी असा चॅनल तयार करुन त्यावर कार्यक्रमाची तोंडओळख, रूपरेषा आणि टीझर्स प्रसारित केले असता कार्यक्रमाच्या दिवशी मोठा दर्शकवर्ग मिळेल.

अभय नातू (चर्चा) ०४:४२, १६ जून २०१२ (IST)[reply]

गौरवसोहळा जरूर व्हावा[संपादन]

गौरवसोहळा जरूर व्हावा, पण त्यासाठी संपादकांची भेटाभेट आणि तोंडओळख व्हायलाच पाहिजे असे नाही. कोणत्याही नावाने एखादा संपादक लिहीत असला त्याच्या लिखाणाचा सोहळ्यादरम्यान जरूर उल्लेख व्हावा, आणि त्यावरून जेवढा परिचय करून देणे शक्य आहे तेवढा करून द्यायला हरकत नसावी. संपादकांच्या कामावरून त्याची वैचारिक पातळी, संपादनांची आशयघनता, लिखाणाची विषयवारी, आकडेवारी वगैरेंच्या विगतवार माहितीचे पूर्वसंकलन करून त्याचा आलेख गौरवसोहळ्यात सादर व्हावा.

ज्यांना या संमेलनाला हजर राहणे शक्य आहे, त्यांचा सोहळ्याच्या वेळी यथोचित सत्कार होणे उचित ठरेल. ........J (चर्चा) १३:०५, ११ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

दशकपूर्ती कार्यक्रम[संपादन]

उत्तम कल्पना. माझा सम्पूर्ण पाठिंबा.... `

विनोद रकटे २२:३२, १७ ऑक्टोबर २०१२ (IST)

इच्छुक स्वयंसेवक[संपादन]

कृपया आपले नाव येथे नोंदवा.