Jump to content

विकिपीडिया:संपादन गाळणी/पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



  • आपोआप होणाऱ्या नोंदी (आणि काही वेळा संपादन अडविले जाणे) या सोयींसाठी मोठा अभ्यास आणि जटील नियम असणे आवश्यक आहेत. अशा नोंदी करताना नोंद करण्यासाठी ठोस कारणे असणे गरजेचे आहे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि कृत्रिम बुद्धमत्ता लागणाऱ्या या नियमांना अभ्यास करून मगच लागू करावे.
  • संपादक गाळणी व्यवस्थापकाने/प्रचालकाने संपादन गाळण्यांच्या मर्यादांची आणि खासगी गाळण्यांतील माहिती बद्दल आपापसातील चर्चा केवळ संबंधीत गाळणीतील नोंदी(notes) (खासगी) विभागातच करावयाची असते सहसा जाहीर वाच्यता करणे आवर्जून टाळायचे असते. कारण हा लेख पहा.संपादन गाळणी संबंधीत सहाय्य आणि सहाय्य पानांचे लेखन सार्वजनिक गाळणीत उपलब्ध सार्वजनिक विवरणास समोर ठेऊनच करावे.

जाणीवपूर्वक उपद्रव करणाऱ्या व्यक्तींना, अभिप्रेत प्रतिबंधांना वळसा घालता येणार नाही याची खात्री झाली तरच खासगी गाळण्यांचे विवरण सार्वजनीक केले जाते.एखादा लेख पूर्ण लॉक करणे अथवा एखादा सदस्य पूर्ण बॅन करणे अशी पाळी येण्या पेक्षा,आवश्यक प्रमाणात संपादन गाळण्या आणि त्यातील माहिती खासगी ठेवणे अंतत: विकिपीडियाचे मुक्तता तत्व जपण्याच्या दृष्टीने मदत करणारे सिद्ध होते.

संपादन गाळण्यांच्या उपयोगा मागचा एक दृष्टीकोण ट्रॅफीकचा नियम तोडल्यानंतर दंड करण्या पेक्षा ट्रॅफीकचे नियम तुटण्याची शक्यता कमीत कमी उरेल अशी ट्रॅफीक अभियांत्रिकी/नियमन राबवणे अधीक योग्य आणि विकिपीडिया मुक्ततेच्या मुल्यास फलदायी ठरू शकते.


संपादन गाळण्यांची रचना

[संपादन]

संपादन गाळण्यांच्या रचना कशी केली जाते याची माहिती करून घेणे संपादन गाळणी कशी तयार केली जाते; या सोबतच नवीन संपादन गाळणीची विनंती करणे तसेच सार्वजनिक संपादन गाळणीत सुधारणा सुचवणे यातही होते.

संपादन गाळणीचा भर विदादात्यास (सर्वरला) कमीत कमी श्रम देऊन,कमीत कमी वेळात हवी असलेली कृती संपादन गाळका कडून करून घेणे यावर असतो.शर्तींची मांडणी करताना उद्दीष्ट साध्य करण्यास तपासावी लागणारी संपादनांकडे लक्ष्य कसे केंद्रीत कसे होईल आणि गरज नसलेली संपादने तपासावयाचे कसे टाळता येईल याचा कल्पकतेने विचार करावा लागतो.

या दृष्टीने सहसा लक्ष्य केंद्र असलेले सदस्य गट (असतील तर) प्रथम सांगितले (लिहिल्या) जातात , त्या नंतर कोण कोणत्या नामविश्वानां सामील करून घ्यावयाचे अथवा टाळावयाचे ते सांगितले जाते.अजून कोणकोणत्या गोष्टी तपासवयाच्या नाहीत हे सांगीतले जाते आणि सर्वात शेवटी काय तपासून हवे ते सांगितले जाते. पण तपासावयाचा सूचक शब्द मीताक्षरी असेल आणि टाळावयाच्या अपवाद शब्दांची यादी मोठी असेल तर काही वेळा अपवादांची यादी नंतर देणे रास्त ठरते.

चले व्हॅरिएबल्स

[संपादन]

युनिक्स टाइम स्टॅंप

[संपादन]
जर समजा आपल्याला संपादन गाळणी मधील शर्ती , ठरवलेल्या दिवशी ठरवलेल्या वेळी, आपोआप अकार्यान्वित करावयाच्या असतील तर युनिक्स टाईम स्टॅंप 'चल' सुविधा timestamp < एखादीयुनिक्सटाईमस्टॅंपव्हॅल्यू असे वापरता येते उदाहरणार्थ जर तुम्हाला संपादन गाळणी 00:00 वाजता ३० नव्हेंबर २०१३(UTC) ला स्थगित होऊन हवी असेल तर आंतरजालावरील हि बाह्य सुविधा वापरून,तारीख आणि वेळेचे युनिक्सटाईमव्हॅल्यू मध्ये रुपांतरण करा आणि मग संपादन गाळणीत timestamp < 1385769600 या प्रमाणे वापरा.

संपादन गाळण्यांचे प्रकार

[संपादन]

टप्पेवार अभिनंदन आणि मार्गदर्शन गाळण्या

[संपादन]

तांत्रिक कार्ये पार पाडणाऱ्या गाळण्या

[संपादन]

सूचक शब्द वापरणाऱ्या गाळण्या

[संपादन]

काही संपादन गाळण्या तयार करताना सूचक शब्दांचा वापर केला जातो,उदाहरणार्थ टाळावयाच्या विशेषणांची यादी , वृत्तपत्रीय वार्तांकन लेखन शैली टाळा

सूचक शब्द नोंदवण्याकरिता मुख्यत्वे contains_any (added_lines,"महान","थोर ") अथवा added_lines irlike"महान|थोर" अशी करता येते. अथवा वगळल्या जात असलेल्या ओळींमधील शब्दांवर लक्ष ठेवण्या साठी added_lines च्या एवजी removed_lines शर्त वापरता येते.

सूचक शब्दास उपसर्ग अथवा प्रत्ययास अक्षर येऊन वेगळे शब्द होत असतील तर,दिलेली शर्त अशा शब्दांनाही होकार (पॉझिटीव्ह) दर्शवेल, उदाहरणार्थ वरील उदाहरणातील थोर या शब्दा सोबत थोरला शब्दाचीही नोंद होईल , पण प्रत्यक्षात थोरला हा शब्द विशेषण नसल्यामुळे तो अयोग्य होकार (फाल्स पॉझिटीव्ह) ठरतो.

उपसर्ग अथवा प्रत्यय असलेल्या शब्दांवर अयोग्य होकार (फाल्स पॉझिटीव्ह) येऊ नये म्हणून !contains_any (added_lines,''अबक'') अथवा ! added_lines irlike ''अबक'' अशी रचना करता येते.शर्तीच्या आधी ! उद्गारवाचक चिन्ह लावणे म्हणजे नको अथवा नाही असा अर्थ होतो.

थोरला या शब्दा चा अपवाद !contains_any (added_lines,''थोरला'') असा अथवा ! added_lines irlike ''थोरला'' असा दिला जाईल.

द्वैअर्थी शब्दांमुळे येणारे अयोग्य होकार

[संपादन]

वरच्या विभागात पाहिल्या प्रमाणे, उपसर्ग अथवा प्रत्ययांमुळे येणाऱ्या अयोग्य होकार देणाऱ्या शब्दांचा अपवाद जोडणे तुलनात्मक रित्या सोपे असते.पण लक्ष ठेवायचे अथवा टाळावयाचे बरेच शब्द एक पेक्षा अधीक अर्थ असलेले (/द्वैअर्थी) असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश वेळा त्या त्या परिपेक्षात वाचताना मानवी मेंदू द्वैअर्थी शब्दाचा सुयोग्य अर्थ आपोआप निवडतो,हि प्रक्रिया संगणक प्रणालींना कठीण जाते. उदाहरणार्थ वाटण वाटलेला खाद्य पदार्थ, वाटण भावनार्थी यातील फरक संगणक प्रणालींना कळणे अवघड असू शकते. या परिस्थितीत संपादन गाळणी व्यवस्थापकास इतर विवीध पर्यायी मार्ग उपलब्ध असू शकतात.

सर्वच द्वैअर्थी परिस्थिती करिता अपवाद देणे आवशक्य असतेच असे नाही. दुसरा अर्थाचे शब्दाचा अर्थ वापर अत्यंत किरकोळ/विरळ असेल आणि मुख्य शब्द गाळणीत असणे अधीक सयूक्तिक असेल तर तसे सूचना गाळणी तसेच जाणत्यांची मदत गाळणी स्तरा पर्यंत शब्द परिस्थितीनुरूप वापरण्यास हरकत नसते.पण अशा शब्दांच्या पूर्ण प्रतिबंधाच्या आधी अपवाद सुयोग्य पद्धतीने जोडले गेले आहेत याची खात्री करावी.

१)नियमीत सानिध्य अपवाद: इथे संपादन गाळणी व्यवस्थापकास लक्ष्यार्थ शब्द येणाऱ्या ओळी आणि अयोग्य होकार देणारे भिन्नार्थ शब्द ओळींचे पॅटर्न तपासून संबंधीत ओळीत नेहमी सोबतीस येणाऱ्या इतर सानीध्य शब्दांचा उपयोग सानीध्य शब्द अथवा अपवाद शब्द म्हणून करता येऊ शकतो.पण हे करताना कुणी वळसा घालणार नाही याची खात्री करावी खात्री नसल्यास आवश्यकतेनुसार गाळणी खासगी मध्ये रुपांतरीत करावी.

काहीवेळा पॅटर्न लोकेट होण्यास सुयोग्य नियमीत सानिध्य अपवाद सुचण्यास वेळ बराच कालावधी लागतो तो लागू द्यावा.

२) संबंधीत लेख/वर्गीकरणे/नामविश्वे समावेश करणारी अथवा अपवाद करणारी विशेष गाळणी बनवण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

३) लेखन बाकी

४)अपवाद क्रमांकन : पर्याय 1 शक्य न झाल्यास आवश्यक परिस्थितीत <!--अपवादक/अपवादका/अपवादकि/--> असा एखादा इतरत्र न वापरलेला प्रत्यय उपसर्ग लागून अथवा इतर कोणत्याही प्रकारचा अर्थ न होणारा शब्द संबंधीत लेखातील ओळीत जोडावा आणि त्यास अपवाद द्यावा संबधीत लेख अथवा संबधीत लेख वर्गा पुरताच अपवाद द्यावा. वेगळी अपवाद दोन नियंत्रण गाळण्या बनवून removed_lines करिता एक आणि इतर लेखात अपवाद वापरला जाऊ नये म्हणून added_lines ची एक असा तीहेरी प्रतिबंध करावा.

५)वरील पर्याय जमत नसतील आणि जाणीव पूर्वक वळसा घातला जात असेल तर, अत्यावश्यक परिस्थिती करिता संबंधीत शब्दाची विशेष खासगी गाळणी लावून संबंधीत सदस्य/सदस्य गट अथवा अंकपत्ता रेंजलाही प्रतिबंधन देता येउ शकते. अशा गाळणीस टाइम पॅरामिटर द्यावा.

सदस्यांनी नोंदवलेल्या अनपेक्षीत अयोग्य होकारांची दखल, नोंद सुयोग्य असल्यास विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी/अनपेक्षित क्रिया पानावर घ्यावी.