Jump to content

विकिपीडिया:संपादन गाळणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संपादन गाळणीच्या द्वारे सदस्यांना विवीध टप्प्यांवर सजगता,मार्गदर्शन आणि अभिनंदन संदेश पोहोचवणे अधीक सुलभ होते.गस्त,पहारा आणि त्रुटी दूर करण्याची कामे करण्याकरिता सुविहीत स्वरूपात माहिती उपलब्ध होते.टाळावयाच्या संपादनांना वेळीच आवर घालून सुविहीत पद्धतीने लक्ष ठेवता येते.

संपादन गाळणी म्हणजे सर्व संपादनांचा सांगितल्याप्रमाणे स्वयंशोध घेणारी स्वयंचलीत सॉफ्टवेअर प्रणाली असते.सदस्यांनी त्यांची संपादने अथवा कृती जतन करण्यास टिचकी मारल्या नंतर त्यांची अविलंब छानणी करून प्रचालकांनी (/संपादन गाळणी व्यवस्थापक) सांगितलेल्या विवीध कृतींवर स्वयमेव अंमलबजावणी करते; जसे की, केवळ पुढील परिक्षणार्थ आणि लक्ष ठेवण्याकरिता पताका(झेंडा) लावून ठेऊन नोंद करून ठेवणे,खूणवणे (टॅग लावणे),संपादन जतन होण्या पुर्वी सुचीत करणे,सदस्यांच्या शक्य (अनवधानाने अथावा जाणीवपुर्वक) अयोग्य संपादन/कृती जतन होण्यापुर्वीच अवरुद्ध करणे,इत्यादी.

संपादन गाळणी व्यवस्थापन हा इंटरफेस तयार केलेल्या गाळण्यांची यादी दाखवतो आणि त्यात सुधारणा करण्यास अनुमती देतो.संपादन गाळण्यांचा निर्मितीच्या वेळचा उद्देश उत्पातास आळा घालणे होता म्हणून जुने नाव दुरुपयोग अथवा अपवापर गाळणी असे होते;परंतु वस्तुत: या संपादन गाळण्यांनी नोंद घेतलेले सर्व बदल/कृती उत्पातक असतातच असे नाही,उलट अभिनंदन मार्गदर्शन अशा स्वरूपाची कामे सुद्धा संपादन गाळण्या करतात म्हणून त्यांचे प्रचलित नाव संपादन गाळणी असे आहे.संपादन गाळण्या केवळ संपादन गाळण्या शिवाय इतरही महत्वपूर्ण चांगल्या कृती करू शकतात म्हणून अधिक चांगल्या चपखल नावाचा शोध अद्यापही चालू आहे.

संपादन गाळणी हा मिडीयाविकि संगणक प्रणालीचा PCRE आज्ञावली उपयोग करणारा विस्तार आहे, ज्याचे विकसन आणि उपयोग २००९ पासून विकिपीडियांवर चालू झाला.संपादन गाळणी सर्व संपादनांना heuristics[मराठी शब्द सुचवा] apply करु देते.संपादन गाळणीस 'जर अमूक एक कृती झाली तर' , जसे की १०० पेक्षा कमी संपादने झालेले सदस्य (user_editcount < 100) अशा सोप्या शर्तींची मांडणी करता येते, अर्थातच अशा मांडणी बऱ्याचदा गुंतागुंतीच्या असू शकतात.

संपादन गाळण्यांची मांडणी आणि उपायोजन अत्यंत सावध पणे करावे लागते.यशस्वी उपयोजना करिता संपादन गाळणी व्यवस्थापकास Regex नियमावलींची माहिती करून घेण्यासोबतच,विकिमीडिया आणि विकिपीडियाची आधारभूत तत्वे, स्थानीक विकिचे संकेत यांची चांगली जाण असणे गरजेचे आहे.संपादन गाळणी व्यवस्थापकास सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी),कल्पकता,भाषा आणि शब्दांशी चांगली मैत्री, खूपशी (क्लिष्ट सुद्धा) संपादने सातत्याने लक्ष ठेऊन तपासण्याची तयारी असावी लागते.


संदर्भ

[संपादन]