विकिपीडिया:सहाय्य नामविश्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहाय्य नामविश्व हे एक ते नामविश्व आहे ज्यात, विकिपीडियाची सहाय्य: या उपसर्गापासून सुरू होणारी पाने आहेत, जसे सहाय्य:दुवा.

या पानांत विकिपीडिया किंवा त्याचे संचेतन वापरण्यास मदत होऊ शकेल, अशी माहिती असते.यातील काही पाने ही विश्वकोशाच्या वाचकांसाठी निर्धारीत असतात; इतर ही संपादकांसाठी असतात ते नवशिके असोत किंवा प्रगत.या सहाय्य नामविश्वातील काही पाने ही मेटा-विकिवरुन नकलविलेली आहेत.