विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाबासाहेब आंबेडकर[संपादन]

पाठिंबा- 'बाबासाहेब आंबेडकर' हा मराठी विकिपीडियावरील अत्यंत दर्जेदार लेख आहे. या लेखामध्ये जवळपास ६०० संदर्भ आहेत, म्हणजेच प्रत्येक बाबीला संदर्भ जोडण्यात आलेले आहे. या लेखाचे स्वरूप विश्वकोशीय आहे, त्याचे विकिकरण झालेले आहे, तसेच यात नकल-डवक मजकूर देखील नाही. याचे कारण - मी या संपूर्ण लेखाचे पुनर्लेखन केलेले आहे आणि प्रचालक @अभय नातू: यांनी ते लेखन तपासून त्यास बाबासाहेब आंबेडकर लेखामध्ये जोडलेले आहे. म्हणजे हा संपूर्ण लेख माननीय प्रचालकांच्या नजरेखालून गेलेला आहे. प्रताधिकार भंग आणि इतर ज्या ज्या समस्यांमुळे पूर्वी या लेखाचे मुखपृष्ठ सदर म्हणूनचे नामांकन रद्द करण्यात आले होते त्यापैकी कोणतीही समस्या या नवीन पुनर्लिखित लेखामध्ये आढळून येत नाही. हा लेख दर्जेदार तर आहेच, त्याशिवाय हा सर्वाधिक संपादित केलेला लेख, सर्वाधिक संदर्भ असलेला लेख, सर्वाधिक मोठ्या लेखांपैकी एक, सर्वाधिक वाचनसंख्येचा लेख, सर्वाधिक दर्जेदार लेख आहे. त्याशिवाय २०२२ या वर्षातील मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या लेखांमध्ये बाबासाहेब आंबेडकर हा लेख पहिल्या क्रमांकावर आहे. मराठी विकिपीडियाच्या इतिहासातील सर्वाधिक वाचला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा लेख आहे. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची १३२ वी जयंती आहे, त्या निमित्ताने त्यांचा लेख मुखपृष्ठ सदर म्हणून ठेवला तर ती बाबासाहेबांना मराठी विकिपीडिया कडून दिलेली एक महत्त्वाची आदरांजली ठरेल. पात्रता वा आवश्यक असलेल्या सर्व अटींची पूर्तता बाबासाहेब आंबेडकर लेख करतो म्हणून संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये हा लेख मुखपृष्ठ सदर म्हणून केला जावा. धन्यवाद.. - Sandesh9822


पाठिंबा- सदरील लेख, त्याचे चर्चा पान आणि त्यासंबंधित इतरत्र झालेल्या चर्चा मी पूर्वीच वाचलेल्या आहेत. केवळ दुर्दैवाने यापूर्वीच्या सदस्यांनी आपला राग आणि अहंकार जोपासल्याने हा लेख सुरक्षित केला गेला. त्यामुळे येथे भरीव योगदान असे झालेच नाही. याचा एक फायदा मात्र असा झाला की संदेश हिवाळे सारख्या जाणकार आणि अभ्यासू सदस्याच्या हातून हा लेख दुरुस्त केल्या गेला आणि अभय नातू यांनी त्याची तपासणी केली. मी स्वतः खारीचा वाटा उचलत यातील लाल दुवे असणाऱ्या शब्दांपासून नवीन लेख निर्माण करून या मुख्य लेखास पूरक असे काम करण्याचा प्रयत्न केला तसेच यातील संदर्भ देखील दुरुस्त केले. होऊ शकते अजून यात काही त्रुटी असतील, परंतु आपण सर्वांनी यात जमेल तसे योगदान किंवा सूचना देऊन हा लेख मुखपृष्ठ सदर लेख व्हावा यासाठी प्रयत्न करावा. बाबासाहेबांचे मूल्य जागतिक स्तरावर खूप मोठे आहे, परंतु ते मराठी व्यक्ती असल्या कारणाने मराठी विकिपीडिया वरील सर्व सदस्यांनी हा प्रतिष्ठेचा विषय करून यास आपला हातभार लावावा ही नम्र विनंती.. - संतोष गोरे


हंपी[संपादन]

  • लेखनाव:हंपी -- नोव्हेंबर २०२३
पाठिंबा - अभय नातू
पाठिंबा - vikrantkorde
पाठिंबा - Nitin.kunjir