विकिपीडिया:मिशन ६६,६६६
मराठी विकिपीडियावर सध्या ९८,११२ लेख आहेत. दिनांक २२ डिसेंबर, २०१७ रोजी मराठी विकिपीडियाने ५०,००० लेखांचा टप्पा पार पाडला. त्यानंतर १९ जून २०२० रोजी पर्यंत (सुमारे ३० महिन्यांत) मराठी विकिपीडियावर फक्त ७,४२० नवीन लेख तयार करण्यात आले आहे. हा अंक वाढवण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात १९ जून २०२० पासून करण्यात आली, आणि तेव्हा ६६,६६६ लेखांचा टप्पा पूर्ण होण्यासाठी ९,२४६ लेखांची आवश्यकता होती. दिनांक २४ डिसेंबर, २०२० रोजी मराठी विकिपीडियाने ६६,६६६ लेखांचा टप्पा पार पाडला; आणि हा प्रकल्प पूर्ण झाला. माडका हा ६६,६६६वा लेख आहे. २४ डिसेंबर, २०२० रोजी मराठी विकिपीडियावर ६६,६६६ लेख तयार होण्याच्या टप्पा पार पडत अधिकचे ४० लेख (६६,६६६+४० = ६६,७०६) निर्माण झाले.
दिनांक १९ जून २०२० रोजी पासून २४ डिसेंबर, २०२० रोजी पर्यंत (सुमारे ६ महिन्यांत) मराठी विकिपीडियावर तब्बल ९,२८६ नवीन लेख तयार करण्यात आले आहे.
हा प्रकल्पाला तीन टप्पे होते - ६०,००० झाले., ६३,३३३ झाले. आणि ६६,६६६ झाले.
आराखडा व अपेक्षा
[संपादन]- नवीन लेख तयार करण्याचा वेग वाढवणे.
- नवीन सदस्यांना नवीन लेख तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- मराठी विकिपीडियासाठी व विकिपीडियावर आयोजित करणारे कार्यशाळा व संपादनेथॉन मध्ये प्रचार करणे.
- नवीन लेखांच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवणे व गरज पडेल तेथे सुधारणे.
- यासाठी विशेष डॅशबोर्ड/ट्रेककिंग टूल्स तयार करुन त्यावर लक्ष देणे.
- टप्पा पार पडल्यावर मोठ्या प्रमाणावर लेख तयार करणाऱ्या सदस्यांचे कौतुक व विकिमीडिया फाउंडेशनद्वारे काही बक्षिसे/कुपोन देणे.
- विकिपीडिया:मिशन ६६,६६६/सांख्यिकी येथे लेखांच्या नोंदी असतील.
निवडक प्रश्न
[संपादन]मी काय करु शकतो?
[संपादन]- अधिकाधिक नवीन लेख तयार करणे.
- यासाठी उल्लेखनीयता निकष लावणे गरजेचे आहे.
- लेखाची गुणवत्ता शक्य तितकी अधिक असावी.
- नवीन तयार झालेल्या लेखांची गुणवत्ता सुधारणे.
- प्रकल्पाची प्रगती मोजण्यासाठी व ती प्रकाशित करण्यासाठी उपकरणे, चित्रे, पाने तयार करणे.
- या प्रकल्पाबद्दल तुमच्या स्नेहीजनांत प्रचार करणे. सोशल मीडियाचाही (योग्यपणे) वापर करणे.
६६,६६६ का?
[संपादन]१९ जून, २०२० रोजी येथे ५७,४२० लेख होते. येथून पुढील मोठी संख्या १,००,००० आहे परंतु हा मोठा पल्ला आहे. तो थोडक्या वेळात पार पाडणे अवास्तव आहे. तरी पुढचा टप्पा ६०,००० असावा असे वाटले. त्यात थोडेसे वाढवून स्ट्रेच गोल[मराठी शब्द सुचवा] घातले तर तुमच्यासारख्या संपादकांचा हुरुप आणि प्रयत्न थोडा अधिक वाढवून लेखांची संख्या तितकीच पुढे नेता यावी यासाठी हा आकडा निवडण्यात आला आहे.
याचा फायदा काय?
[संपादन]- मराठी विकिपीडियावर जितके जास्त (गुणवत्तापूर्ण) लेख असतील तितके ज्ञान मराठीतून मुक्तपणे उपलब्ध होईल. हे विकिमीडियाच्या मुख्य उद्देशाला पूरक आहे.
- यासाठी वेगळा प्रकल्प केल्याने याकडे लक्ष वेधले जाईल.
- नवीन संपादकांना नेहमी पडणारा मी आता काय करू? या प्रश्नालाही उत्तर मिळेल.
- आकडेवारी असल्याने संपादकांना एक लक्ष्य मिळेल. लक्ष्यवेधी प्रयत्नांती फळ लवकर व अधिक चांगले मिळते.
- संपादकांच्या अथक प्रयत्नांचे अधिकृतपणे कौतुक होईल. हा प्रयत्न विकिमीडिया फाउंडेशनच्या लक्षात आणून देउन शक्य झाल्यास बक्षिसे किंवा तत्सम इतर प्रोत्साहनही देता येईल.
देकरेख करण्यास इच्छुक सदस्य
[संपादन]मराठी विकिपीडियावर तयार करण्यात आलेली सर्व लेख या प्रकल्पात जोडली जाईल. जर आपण देखरेख कामे जसे नवीन सदस्यांना मार्गदर्शन, लेख शुद्धीकरण, इत्यादी करण्यास इच्छुक असाल तर आपले नाव खाली नोंदवा
- --Tiven2240 (चर्चा) २०:३२, १९ जून २०२० (IST)
- -- अभय नातू (चर्चा) २१:५६, १९ जून २०२० (IST)
- --संदेश हिवाळेचर्चा ०२:०७, २० जून २०२० (IST)
- -- Rockpeterson