विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १९
Appearance
- इ.स. १९०५ - लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली
- इ.स. १९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले
- इ.स. १९६३ - झांझिबारला (ध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
- इ.स. १९७२ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले
- इ.स. २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण
- २०१० - सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला
- २०१० - राहूल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला