वास्तविक नियंत्रण रेषा
Jump to navigation
Jump to search
वास्तविक नियंत्रण रेषा (इंग्लिश: Line of Actual Control) ही भारत व चीन देशांच्या वादग्रस्त सीमाप्रदेशामध्ये काढलेली ४,०५७ किमी लांब सीमारेषा आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व चिनी पंतप्रधान चौ एन्लाय ह्यांनी ही रेषा स्थापन केली.
ही रेषा भारताच्या जम्मु आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना लागून आहे. पूर्वेस ही रेषा सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांतून जाते.
ही रेषा सर्वमान्य आंतरराष्ट्रीय सीमा नसली तरीही दोन देशांच्या सैन्यांनी ही स्वीकारलेली आहे.