वाल्हे (पुरंदर)
?वाल्हे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जेजुरी |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
वाल्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
"वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी"
जेजुरी पासून जरा पुढे गेलं की वाल्हे गावात जरा थोडंसं आत महर्षी वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे.
येथे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या रामायणकार वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली आहे...याठिकाणी एक छोटे मंदिर आहे.
या मंदिराच्या बाजूला ज्या डोंगर रांगा आहेत त्यातल्याचं एका डोंगरावर वाल्याचे सात दगडी रांजण आहेत...
तिथे जायला रस्ता नाही, चार पाच किमी पायवाट तुडवत उंच डोंगर चढत जावं लागतं...
या मंदिराच्या बाहेर पिंपळाचे झाड आहे, याचं ठिकाणी वाल्याने श्री नारद मुनींना एका अडवून त्यांना लुटायचा प्रयत्न केला आणि तेथेच नारद मुनींनी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त करून दिले म्हणून त्या झाडाला पवित्र मानून ते पूजले जाते...
या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात वाल्या, महर्षी वाल्मिकी ऋषी ते रामायण अशी सगळी कथा पेंटिंगच्या रुपात भिंतीवर फ्रेमच्या माध्यमातून बघायला मिळते.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]जेजुरी - निरा - गुळुंचे - नावळी
कोळविहीरे - मांडकी