वन पाणलावा (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वन पाणलावा

वन पाणलावा (इंग्लिश:Wood Snipe; हिंदी:चहा,चाहा) हा एक पक्षी आहे.

वन पाणलावा हा इतर पाणलाव्यापेक्षा दिसायला मोठा,तसेच,रुंद आणि गोलाकार पंख असतात.अत्यंत सावकाश उड्डाण.ह्या वैशीष्ट्यामुळे वेगळा वाटतो.तो दिसायला लिकीर पक्ष्यासारखा असतो.वरील भागावर स्पष्ट,रुंद आणि गर्द तपकिरी वर्णाच्या रेघोट्या आणि खवले असतात.खालील भागावर पिवळट,तपकिरी आणि चितकबऱ्या रंगाचे पट्टे असतात. वन पाणलावा हा हिमालयाचा खालचा,आसाम,मेघालय,मणिपूर,दक्षिण भारताचा पर्वतीय प्रदेश आणि श्रीलंका ह्या भागात हिवाळी पाहुणे मनून येतात.पाणलावा हा झिलानी आणि नाल्यांचा काठ या ठिकाणी राहतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली