ल्युबेक
Appearance
ल्युबेक Lübeck |
||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | जर्मनी | |
राज्य | श्लेस्विग-होल्श्टाइन | |
क्षेत्रफळ | २१४.१ चौ. किमी (८२.७ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४३ फूट (१३ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,१०,५७७ | |
- घनता | ९८३ /चौ. किमी (२,५५० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.luebeck.de |
ल्युबेक (जर्मन: Lübeck) हे जर्मनी देशाच्या श्लेस्विग-होल्श्टाइन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कील खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात हांबुर्गच्या ७५ किमी वायव्येस बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिकमधील जर्मनीचे सर्वात मोठे बंदर आहे.
मध्य युगीन काळातील अनेक शतके हान्से ह्या वाणिज्य व संरक्षण मंडळाची राजधानी असलेल्या ल्युबेकचा येथील गॉथिक प्रकाराच्या ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला गेला आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |