Jump to content

जेटब्ल्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेटब्ल्यू एरवेझ या पानावरून पुनर्निर्देशित)
जेटब्ल्यू
आय.ए.टी.ए.
B6
आय.सी.ए.ओ.
JBU
कॉलसाईन
JETBLUE
स्थापना ऑगस्ट १९९८
हब जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (न्यू यॉर्क शहर)
मुख्य शहरे फोर्ट लॉडरडेल
लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
लॉंग बीच
सान हुआन
ऑरलॅंडो
फ्रिक्वेंट फ्लायर ट्रूब्ल्यू
विमान संख्या २०७
गंतव्यस्थाने ८७
ब्रीदवाक्य You Above All
पालक कंपनी जेटब्ल्यू एरवेझ कॉर्पोरेशन
लुफ्तान्सा समूह (१५.८५%)
मुख्यालय क्वीन्स, न्यू यॉर्क
संकेतस्थळ https://www.jetblue.com/
वॉशिंग्टन, डी.सी.च्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जेटब्ल्यूचे एरबस ए३२० विमान

जेटब्ल्यू (JetBlue Airways Corporation) ही कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. १९९८ साली स्थापन झालेली जेटब्ल्यू अमेरिकेच्या अनेक शहरांसह कॅरिबियन, मध्य अमेरिका इत्यादी देशांमधील शहरांना देखील प्रवासी विमानसेवा पुरवते. न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात जेटब्ल्यूचे मुख्यालय असून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख तळ आहे.

जेटब्ल्यू अमेरिका, मेक्सिको, पेरू, पोर्तो रिको, बहामास, बर्म्युडा, बार्बाडोस, कोलंबिया, कॉस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, जमैका, मेक्सिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो सह ९७ ठिकाणि विमानसेवा पुरवते.

जेट ब्लू एरवेझ कॉर्पोरेशन किंवा जेट ब्लू ही एक अमेरिकन विमान कंपनी आहे जी अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमानकंपनी आहे. तसेच त्यांचे कॉटनवूड हाइटस, उताह येथे सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस आहे.[]

मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार जेट-ब्लूच्या अमेरिका, मेक्सिको, करेबिअन, सेन्ट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये १०० ठिकाणी सेवा आहेत.

इतिहास

[संपादन]

जेट-ब्लू ऑगस्ट १९९८ मध्ये इनकार्पोरेटेड झाली.[] डेविड नीलमन यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये “न्यू एर” या नावाखाली तिची स्थापना केली.[] जेट-ब्लू ने दक्षिण-पश्चिमी पद्धतीनुसार तिकीट दर कमी ठेवून सुरुवात केली पण विमानातील मनोरंजन जसे कि प्रत्येक सीट जवळ असलेला टीव्ही आणि उपग्रह रेडीओची सुविधा देऊन आपले वेगळेपण जपले. नीलमनच्या म्हणण्यानुसार “विमान प्रवासात मानवता परत आणणे” हेच जेट-ब्लूचे उद्दिष्ट आहे.

सप्टेंबर १९९९ मध्ये कंपनीला जॉन एफ, केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरुवातीला ७५ टेक ऑफ/ लॅंडिंगचे स्लॉट्स मिळाले आणि फेब्रुवारी २००० मध्ये त्यांना अमेरिकन सरकारकडून औपचारिक परवानगी मिळाली. ११ फेब्रुवारी २००० पासून बफेलो आणि फोर्ट लॉडरडेल ह्या शहरांना सेवा सुरू करून कंपनी कार्यरत झाली.

जेट ब्लूच्या संस्थापकांसाठी ही एक टॅक्सी होती, म्हणून न्यू यॉर्क शहराशी जवळीक वाटावी यासाठी त्यांनी विमानांना पिवळे आवरण देण्याचे ठरविले. पण नंतर काही कारणांमुळे ती योजना रद्द करण्यात आली.[]

जेट ब्लू ही त्या काहि कंपन्यांपैकी एक होती ज्यांनी ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आलेल्या मंदीतही नफा कमविला होता.[]

हवाई क्षेत्रात जेट ब्लूला टक्कर देण्यासाठी काही कंपन्यांनी छोट्या छोट्या उपकंपन्या स्थापित केल्या; जसे कि डेल्टा एरलाइन्स ने 'सॉंग' तसेच युनायटेड एरलाइन्स ने 'टेड' या कंपन्या सुरू केल्या. काही काळाने 'सॉंग' बंद करण्यात अली तर 'टेड'ला युनायटेड एरलाइन्स मध्ये विलीन करण्यात आले.

ऑक्टोबर २००५ मध्ये इंधनाच्या किमती वाढल्याने कंपनीचा नफा ८.१ अमेरिकन डॉलर्स वरून २.७ डॉलर्सवर घसरला. कार्यान्वयीन समस्या, इंधनाच्या किमती, आणि कमी प्रवास भाडे जी कंपनीची ओळख होती, या सगळ्या गोष्टी कंपनीचा नफा कमी करत होत्या. तसेच कंपनीच्या इतर सुविधांच्या वाढत्या किमतींमुळे कंपनी स्पर्धेतून बाहेर फेकली जात होती

तरीही कंपनीने आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये कंपनीने अजून ३६ नवी विमाने विकत घेतली.[]

बरीच वर्षे विश्लेकांच्या कंपनी नुकसानीत जाण्याचा अंदाज वर्तविला होता. तरीही कंपनीने आपल्या ताफ्यात नवीन विमाने तसे नवीन मार्ग समाविष्ट करणे सुरूच ठेवले.

२००५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने त्यांचा पहिलावहिला तोटा अनुभवला जेव्हा कंपनी ४२.२ मिलियन अमेरिकन डॉलर्स तोट्यात होती. ज्यामुळे त्यांचे संपूर्ण २००५ वर्ष तोट्यात गेले. हा तोटा २००२ मध्ये कंपनी पब्लिक केल्यापासूनचा पहिला तोटा होता. २००६ मधेही कंपनी तोट्यात राहिली.

डिसेंबर २००६ मध्ये कंपनीने त्यांच्या RTP योजनेनुसार त्यांच्या A320 या विमानातील आसनांची एक रांग काढून टाकली ज्याने विमान ४१० किग्रॅ ने हलके झाले. आणि विमानाच्या क्रू मेंबर्सची संख्या ४ वरून ३ करण्यात आली[9]. या योजनेमुळे कंपनीचा २००६ या संपूर्ण वर्षातील तोटा १ मिलियन अमेरिकन डॉलर्स वर आला जो २००५ या वर्षात २० मिलियन अमेरिकन डॉलर्स होता.

जेट ब्लू विमानांना सहा वेळा अपघात झालेत परंतु त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

जेट ब्लू ने १२ मे २०१०ला साऊथ आफ्रिकन एरवेझ, २२ मार्च २०११ला वर्जिन अटलांटिक एरवेझ, २ नोव्हेंबर २०११ला जेट एरवेझ आणि १२ जून २०१२ला एर चायना शी इंटरलाईन करार केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "JetBlue's HQ contest down to NYC, Orlando".
  2. ^ "United States Securities and Exchange Commission".
  3. ^ "Our Company - History".
  4. ^ "The Steady, Strategic Ascent of JetBlue Airways".
  5. ^ "JetBlue, Exception Among Airlines, Is Likely to Post a Profit".
  6. ^ "Connectivity and Fleet Information - JetBlue Airways". 2016-04-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-04 रोजी पाहिले.
  7. ^ "JetBlue and Jet Airways to Partner on Interline Service to Brussels and Beyond to India".

बाह्य दुवे

[संपादन]