लाहिरी महाशय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लाहिरी महाशय

श्यामाचरण लाहिरी (बंगाली : শ্যামাচরণ লাহিড়ী)(सप्टेंबर ३०, इ.स. १८२८ - सप्टेंबर २६, इ.स. १८९५) हे लाहिरी महाशय या नावाने अधिक प्रसिद्ध असणारे भारतीय योगी आणि महावतार बाबाजी यांचे शिष्य होते. योगीराज आणि काशीबाबा या नावांनीही ते लोकप्रिय होते. महावतार बाबाजींकडून १८६१ मध्ये शिकून घेतलेले क्रिया योगाचे तंत्र त्यांनी पुनरुज्जीवित केले. लाहिरी महाशय हे युक्तेश्वर गिरी यांचे गुरू होते. संस्कृतमध्ये महाशय या उपाधीचा 'मोठ्या मनाचा' असा होतो.[१] भारतीय साधूंशी तुलना करता ते वेगळे होते; कारण त्यांनी लग्न केले, कुटुंब चालविले, लष्करी अभियांत्रिकी खात्यात ब्रिटिश सरकारसाठी हिशेबनिसाचे काम केले. मंदिर किंवा मठात राहण्याऐवजी ते वाराणसीला आपल्या घरीच राहिले. एकोणिसाव्या शतकात हिंदू धर्मवाद्यांमध्ये त्यांचा बोलबाला होता.


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Yogananda, Paramahansa (1997). Autobiography of a Yogi, 1997 Anniversary Edition. Self-Realization Fellowship (Founded by Yogananda) http://www.yogananda-srf.org/. ISBN 0-87612-086-9.