युक्तेश्वर गिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युक्तेश्वर गिरी

युक्तेश्वर गिरी (श्रीयुक्तेश्वर असेही लेखन) (बंगाली : শ্রী যুক্তেশ্বর গিরী)(मे १०, इ.स. १८५५ - मार्च ९, इ.स. १९३६) हे प्रियनाथ कारार (बंगाली : প্রিয়নাথ কাঁড়ার) यांचे आध्यात्मिक जीवनातील नाव आहे. ते सत्यानंद गिरीपरमहंस योगानंद यांचे गुरू होते. युक्तेश्वर हे शिक्षक, खगोलविद, ज्योतिषी, योगी आणि भगवद्गीताबायबलवर श्रद्धा असणारे सत्पुरुष होते. वाराणसीचे लाहिरी महाशय हे युक्तेश्वरांचे गुरू होते. स्वामी परंपरेतील गिरी शाखेचे ते सदस्य होते. योगानंद मुक्तेश्वरांना ज्ञानावतार समजत असत.[१]


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Yogananda, Paramahansa (1997). Autobiography of a Yogi, 1997 Anniversary Edition p. 383. Self-Realization Fellowship (Founded by Yogananda) http://www.yogananda-srf.org/, Chapter 35, p.383.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत