लार्स ऑन्सेगर
Jump to navigation
Jump to search
लार्स ऑन्सेगर (नॉर्वेजियन: Lars Onsager; २७ नोव्हेंबर, इ.स. १९०३, ओस्लो - ५ ऑक्टोबर, इ.स. १९७६, मायामी, फ्लोरिडा) हा एक नॉर्वेजियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या भौतिक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९६८ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
१९२५ साली ओस्लोमधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर १९२८ साली ऑन्सेगरने अमेरिकेला स्थानांतर केले. बॉल्टिमोरच्या जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठ व प्रॉव्हिडन्सच्या ब्राउन विद्यापीठामध्ये काही काळ शिकवल्यानंतर १९३३ साली ऑन्सेगरला येल विद्यापीठामध्ये शिकवण्याची व संशोधन करण्याची संधी मिळाली. तो १९७२ सालापर्यंत येल विद्यापीठामध्येच प्राध्यापक राहिला व त्याने अनेक संशोधन पत्रे प्रकाशित केली.