Jump to content

रॉबर्ट पिरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट पिरेस

रॉबर्ट पिरेस (पोर्तुगीज: Robert Pirès; २९ ऑक्टोबर १९७३ (1973-10-29), रेंस) हा एक फ्रेंच फुटबॉलपटू आहे. १९९६ ते २००४ दरम्यान फ्रान्स राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला पिरेस १९९८ फिफा विश्वचषक, युएफा यूरो २००० व २००१ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये फ्रान्सडून खेळला आहे. क्लब पातळीवर पिरेस १९९३-९८ दरम्यान लीग १मधील एफ.सी. मेस, १९९८-२००० दरम्यान ऑलिंपिक दे मार्सेल, २०००-०६ दरम्यान प्रीमियर लीगमधील आर्सेनल एफ.सी., २००६-१० दरम्यान ला लीगामधील व्हियारेआल सी.एफ., २०१०-११ दरम्यान ॲस्टन व्हिला एफ.सी. तर २०१४ पासून भारताच्या इंडियन सुपर लीगमधील एफ.सी. गोवा ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]