Jump to content

रुद्रम् (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुद्रम या पानावरून पुनर्निर्देशित)
रुद्रम्
कलाकार मुक्ता बर्वे, मोहन आगाशे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी युवा
प्रथम प्रसारण ७ ऑगस्ट २०१७ – १६ नोव्हेंबर २०१७

रुद्रम ही मराठीतील एक साहसी थरारक मालिका आहे. या मालिकेचे प्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर झाले होते. या मालिकेचे लेखन गिरीश जोशी व दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले होते. या मालिकेची निर्मिती निखिल शेठ, विनोद लव्हेकर व संदेश कुलकर्णी यांनी हाऊस पोतडी एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेद्वारा केली होती. या मालिकेचे पहिले प्रक्षेपण दिनांक ७ ऑगस्ट २०१७ रोजी झाले होते. या मालिकेचा शेवटचा भाग दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. या मालिकेचे एकूण ७४ भाग प्रसारित झाले होते.

कथानक

[संपादन]

रागिणी देसाई (मुक्ता बर्वे) ही एक सामान्य जीवन जगणारी गृहिणी असते. एका अपघातामध्ये तिचे वडिल, पती व दोन वर्षाचा मुलगा यांचे निधन होते. या धक्क्यातून सावरत असतानाच तिला कळते की त्यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपाती कृत्य होते. त्यामुळे पेटून उठून ती या घटनेमागील सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर सूड उगवायचा असे ठरवते. तिच्या या थरारक सूडकथेची मांडणी या मालिकेमध्ये केलेली आहे.

कलाकार

[संपादन]

१) मुक्ता बर्वे- रागिणी देसाई

२) वंदना गुप्ते – रागिणीची आई

३) किरण करमरकर- माखिजा

४) सुहास पळशीकर – चंदू दादा

५) सागर तळाशीकर

६) सतीश राजवाडे

७) मिलिंद फाटक

८) सुनील अभ्यंकर

९) मोहन आगाशे

१०) आनंद अलकुंटे – इन्स्पेक्टर सदानंद धुरत

११) विवेक लागू

१२) अनिरुद्ध जोशी

१३) मिताली जगताप

१४) संदीप पाठक

१५) सुहास शिरसाट

१६) सई रानडे

१७) किरण खोजे

१८) आशिष कुलकर्णी

१९) प्रथमेश गुरव

माहिती

[संपादन]

या मालिकेच्या प्रेक्षकांना कथेमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी वाहिनीकडून समाज माध्यमांवर एक साप्ताहिक मालिका सादर केली जात होती.

नोंदी

[संपादन]

1.     Zee Yuva (7 August 2017), Rudram | Starts From 7 August Mon – Fri, at 9.30 pm. Only on Zee Yuva., retrieved 16 November 2017

2.     "काळजाचा ठोका चुकवणारी 'रुद्रम'". Loksatta (in Marathi). 6 August 2017. Retrieved 16 November 2017.

3.     "Mukta Barve back on TV with Rudram". The Times of India. Retrieved 16 November 2017.

4.     "'रुद्रम' ग्राफिकल मालिका स्वरूपात". Loksatta (in Marathi). 16 September 2017. Retrieved 16 November 2017.

संदर्भ

[संपादन]