विवेक लागू
Appearance
विवेक लागू | |
---|---|
जन्म |
विवेक शंकर लागू १५ ऑक्टोबर, १९५३ |
मृत्यू | १९ जून, २०२५ (वय ७१) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | चल आटप लवकर |
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | गुंतता हृदय हे |
वडील | शंकर लागू |
पत्नी | रीमा लागू |
अपत्ये | मृण्मयी लागू (कन्या) |
विवेक लागू (ऑक्टोबर १५, १९५३ - १९ जून, २०२५) हे मराठी नाटककार आणि नाट्यअभिनेते होते. नाट्य-चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचे ते पती होते. दिनांक १९ जून २०२५ रोजी त्यांचे देहावसान झाले.[१]
लागू यांचा विवाह रीमा लागू यांच्याशी १९७८ मध्ये झाला होता. परंतु लवकरच ते वेगळे झाले. २०१७ साली रीमा लागू यांचे निधन झाले. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे, मृण्मयी लागू वैकुल असं तिचं नाव असून तिने 'थप्पड', 'स्कुप' सारख्या चित्रपटांचं लेखन केलं आहे.[१]
विवेक लागू यांनी लिहिलेली नाटके
[संपादन]- चल आटप लवकर
- प्रकरण दुसरे
- सर्वस्वी तुझीच!
विवेक लागू यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
[संपादन]- तुला मी..मला मी[२]
विवेक लागू यांचा अभिनय असलेली नाटके:
[संपादन]- अबोल झाली सतार
- आपलं बुवा असं आहे
- कोपता वास्तुदेवता
- जंगली कबूतर
- ती वेळच तशी होती
- बीज
- रानभूल
- सूर्यास्त
- स्पर्श
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b "सिनेसृष्टीला धक्का! रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती आणि दिग्गज अभिनेते विवेक लागू यांचे अकस्मात निधन". सकाळ. १९ जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ रिमा लागू. ""तुला मी..मला मी"तील रीमा लागू". ५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- विवेक लागू. "मृण्मयी...सानसुई... सानू..." 2012-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.