Jump to content

रिळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?रिळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिराळा
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

रिळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

सांगली जिल्ह्यात शिराळा गावापासून ११ किमी अंतरावर रिळे नावाचे गाव आहे. तिथे एक ५० लाख (?) रुपये खर्च करून बांधलेले भैरवनाथाचे मंदिर आहे. ते एक जागृत देवस्थान आहे, असे काही लोक मानतात. हा देव अतिशय गरीब लोकांचा कुलस्वामी आहे. देवाची यात्रा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये भरते. या यात्रेस हजारो भाविक उपस्थित राहतात. मंदिराच्याच शेजारी मंदिराचे पुजारी राहतात यात्रेच्या पहिल्या दिवशी शिंदे सरकारांच्या हस्ते महाप्रसाद वाटला जातो. नंतर रात्री दि ग्रेट मराठा ग्रुपतर्फ सांस्कृतिक कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी पालखी होते; नवनाथ गणेश मंडळ व धाडस ग्रुप यांच्यातर्फ कार्यक्रम होतो. तिसऱ्या दिवशी रिळे याञा कमिटीतर्फ कुस्तीचा आखाडा भरतो.

रिळे गाव हे शिराळा तालुक्यात राजकीयदृष्टया महत्त्वाचे मानले जाते

रिळे गावाशेजारी चार लहान-मोठ्या वाड्या आहेत. त्यांच्या साठी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो.

या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, महाराष्ट्र हायस्कूल ही माध्यमिक शाळा आणि ११व१२वीपर्यंतचे विज्ञान महाविद्यालय आहे.

ही संत नामदेव यांची जन्मभूमी आहे, असे सांगितले जाते.

रिळे गावाजवळून वारणा नदी वाहते. गावात शेती प्रामुख्याने उसाची होते. तरीसुद्धा काहीजण भात, भुईमूग, ज्वारी अशी पिके काढतात.

गावात एक प्राथमिक आरोग्य क्रेंद्र व सरकारी जनावरांचा दवाखाना आहे. औषधांची दुकाने आहेत व खाजगी डॉक्टरांचे दवाखाने आहेत.

गावची लोकसंख्या २२०० च्या आसपास आहे

रिळे गावाच्या मध्यभागी ग्रामसचिवालय व कुस्तीची तालीम आहे

९ सदस्य असलेल्या रिळे ग्रामपंचायतची स्थापना १९६५ साली झाली. गावात ३ मतदार वॉर्ड आहेत.

लेखात:गणेश खामकर

हवामान

[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate