Jump to content

दांडिया रास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रास या पानावरून पुनर्निर्देशित)

दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे.[][] हे समूहनृत्य शारदीय नवरात्रात विशेषत्वाने केले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.[]

दांडिया नृत्य

स्वरूप

[संपादन]
दांडिया रास

रंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात. या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे संबोधिले जाते. स्त्री आणि पुरुष गोलाकार फेर स्वरूपात हे नृत्य करतात.[] रंगीबरंगी पोशाख आणि दागिने घालून महिला या नृत्यात सहभागी होतात तर पुरुष पारंपरिक पगडी, धोतर असा पोशाख परिधान करतात. या पोशाखांवर काचांचे तुकडे, लोलक किंवा मोती इ.चा वापर करून नक्षीकाम केले जाते आणि या पोशाखांचे सुशोभीकरण केले जाते.[]

परंपरा

[संपादन]
नृत्य करणारी कलाकार

राधा आणि कृष्ण यांच्या पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. कृष्णाने राधा आणि अन्य गोपी यांच्यासह रासक्रीडा केली.[] या रासक्रीडेची आठवण म्हणून स्त्री आणि पुरुष दांडिया रास खेळतात असे मानले जाते.[]

दांडिया दृकश्राव्य चित्रफीत

[संपादन]
मेहसणा गुजरात येथील दांडिया

पनघट

[संपादन]
  • पोपटीयो[]
  • हुड्डा
  • हिच

याशिवाय गुजरातमधील गावांच्या नावावरूनदेखील प्रकार आहेत जसे:

लोकप्रियता

[संपादन]

या नृत्यप्रकाराची समाजात लोकप्रियता आहे आणि युवापिढीत या नृत्याचे आकर्षण आहे.[] शारदीय नवरात्र काळात विविध संस्था किंवा संयोजन संस्था मोकळ्या पटांगणावर दांडिया नृत्याचे व्यावसायिक स्वरूपात आयोजन करतात.[१०] हा नृत्यप्रकार चित्रपटांच्या माध्यमातूनही समाजात प्रसारित झालेला दिसतो.[११]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Garba | dance". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2020-10-05 रोजी पाहिले.
  2. ^ Singh. Bharat 2008 (Hindi Title) (हिंदी भाषेत). Tata McGraw-Hill Education. ISBN 978-0-07-022167-3.
  3. ^ Vedavāṇī (हिंदी भाषेत). Śrī Rāmalāla Kapūra Ṭrasṭa. 1993.
  4. ^ Sinha, Aakriti (2006). Let's Know Dances of India (इंग्रजी भाषेत). Star Publications. ISBN 9788176500975.
  5. ^ "नवरात्री विशेष : गरबा : कालचा आणि आजचा!!". लोकसत्ता. 2015-10-09. 2020-10-06 रोजी पाहिले.
  6. ^ Schweig, Graham M. (2018-06-26). Dance of Divine Love: India's Classic Sacred Love Story: The Rasa Lila of Krishna (इंग्रजी भाषेत). Princeton University Press. ISBN 978-0-691-19017-4.
  7. ^ Mohanty, Jatindra Mohan (2006). History of Oriya Literature (इंग्रजी भाषेत). Vidya. ISBN 978-81-903438-0-0.
  8. ^ Ataeva: Uttara Pradeśa Hindī Saṃsthāna ka traimāsika (हिंदी भाषेत). Uttara Pradeśa Hindī Saṃsthāna. 1992.
  9. ^ Akotkar, Aniket (2022-09-24). "चालो तो रमवाने, गरबो..." Mandal News (इंग्रजी भाषेत). 2022-09-28 रोजी पाहिले.
  10. ^ "गरबा, दांडियास यंदा मनाई; नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स". महाराष्ट्र टाइम्स. 2020-10-06 रोजी पाहिले.
  11. ^ "Navratri special song of the day: Sabse bada tera naam from Suhaag". Bollywood Life (इंग्रजी भाषेत). 2013-10-10. 2020-10-06 रोजी पाहिले.