मोती
मोती एक मौलव्यान खडा आहे. इतर मौल्यवान खड्यांप्रमाणे हा खनिज नसून प्राणीजन्य आहे. याचे अस्सल मोती, कल्चर्ड मोती आणि नकली मोती असे प्रकार पडतात. याचा उपयोग विविध प्रकारचे अलंकार तयार करण्यासाठी होतो.महाराष्ट्रात मोत्यांना विशेष मागणी असून नथ, विविध प्रकारचे गळ्यातील दागिने (चिंचपेटी,तनमणी इ.),तोडे, कुड्या, बाजूबंद,कंबरपट्टा आदी महिलांचे तर पुरूषांच्याही शेरवानी-धोती किंवा तत्सम कपड्यांमध्ये आणि साखळी मध्ये किंवा कानात मोती घातला जातो.
अस्सल मोती : हा मोती कालव/ शिंपल्यातून नैसर्गिकरीत्याच बाहेर पडतो.शिंपल्यात धुळ,वाळू वा एखादा कण गेल्यास आतील नेेकर नामक चिकट पदार्थ त्याभोवती आवरण तयार करून कवचात बंद करून घेतो. तेेच नंतर कठीण स्वरूपात आपल्यासमोर मोती म्हणून येतेे.अस्सल मोती हा वजनाने नकली मोत्यापेक्षा जड आणि एक वेगळ्याच प्रकारची तकाकी असलेला दिसतो.
कल्चर्ड मोती: हा मोत्यांच्या शेतीचा एक भाग आहे.कालवांत/ शिंपल्यात आपणहून धुळीचा कण किंवा खड सोडून काही ठराविक कालावधीनंतर उघडल्यानंतर आतून मिळणारे बंदिस्त गोलाकृती पांढरे कवच म्हणजेच हा कल्चर्ड मोती होय.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |