रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[ चित्र हवे ] रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बोरगाव खुर्द ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील बोरगाव खुर्द गावातील प्राथमिक शाळा आहे. हीचे व्यवस्थापन रायगड जिल्हा परिषद करते. ही शाळा इ.स. १९५२-५३साली स्थापन झाली. २०११ साली शाळेमध्ये १७० विद्यार्थी शिकत होते. शिक्षकांची संख्या ६ आहे.

भौतिक सुविधा[संपादन]

सहयाद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या बोरगावातील प्राथमिक शाळेची इमारत प्रशस्त व टुमदार(दोन्ही गुण एका वेळी?) आहे.शाळा बऱ्यापैकी भौतिक सुविधांनी सुसज्ज आहे. शाळेमध्ये एकूण ८ वर्ग खोल्या आहेत. शाळेमध्ये असलेल्या ग्रंथालयात अनेक विषयांवरची पुस्तके आहेत. या पुस्तकांचे वाचन विद्यार्थी नियमितपणे करतात.शाळेत पोषण आहार योजनेनुसार मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यासाठी मुला-मुलींकरिता बसण्यासाठी बाके व जेवणाकरिता ताटे आहेत. शाळेसमोर प्रशस्त मैदान आहे.

शाळेसमोर विद्यार्थ्यांनी छोटीशी बाग तयार केलेली आहे. या बागेतच विद्यार्थांना खेळण्यासाठी झोके व घसरगुंड्या इत्यादी खेळाचे साहित्य आहे. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय तसेच स्वच्छतागृह आहेत.

सहशालेय उपक्रम[संपादन]

बोरगावच्या शाळेत विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक स्पर्धा घेतल्या जातात. या सर्व स्पर्धांमध्ये व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात. केंद्र पातळी, बीट पातळी तसेच तालुका पातळी इत्यादी स्तरांवरील स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. त्यांना वेळोवेळी यश मिळाले आहे. साचा:नेमके कोणते यश आणि नेमके कुणाला, स्पष्ट नमूद करा. शक्य असल्यास संदर्भ नमूद करा.शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रकारे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करवून घेतले आहे.[ संदर्भ हवा ].

संगणक शिकविण्याकरीता शाळेत स्वतंत्र शिक्षकही उपलब्ध आहेत. होमी भाभा ‌वि‌ज्ञान केंद्रातील काही तज्ज्ञ प्रशिक्षक नियमितपणे शाळेत येतात आणि शाळेतील विद्यार्थ्याना व शिक्षकांना संगणकाचे शिक्षण देतात.

समाज साहाय्य[संपादन]

आदिवासी उन्नती मंडळातर्फे समाज सहभागातून संगणक कक्ष व आधुनिक सुविधांसह दोन वर्गखोल्या बांधून मिळाल्या आहेत. वैयक्तिक पानळीवर श्री. मधु सोनी (मुंबई) यांचे खूप सहकार्य लाभले आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रगती दिसून येते.[ संदर्भ हवा ]

शाळेतील विद्यार्थी हे दूरदूरच्या आदिवासी वाडयांतून येतात, त्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेच्या वतीने खाजगी बससेवा उपलब्ध झालेली आहे.[ संदर्भ हवा ] या सुविधेचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. या शाळेतील माजी मुख्याध्यापक श्री अनंत झिपरू ठाकुर यांच्या प्रेरणेतून हे सर्व उपक्रम राबविले गेले आणि आजही त्यांचे या कामांत मोलाचे सहकार्य मिळते आहे.[ संदर्भ हवा ]

व्यवस्थापन[संपादन]

बोरगाव खुर्द शाळेचे कामकाज व व्यवस्थापन चांगल्या प्रकारे व सुरळीत चालावे म्हणून शाळेतील सर्व शिक्षक विचारविनिमय करून ‌‌एकमताने प्रयत्नशील होते आणि आजही आहेत.[ संदर्भ हवा ]

हेसुद्धा पहा[संपादन]