Jump to content

बोरगाव खुर्द (खालापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोरगाव खुर्द (जिल्हा रायगड) या पानावरून पुनर्निर्देशित)

बोरगाव खुर्द हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील गाव आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाच्या पायथ्याशी मोर्बे धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाच्या सान्निध्यात वसलेले आहे.

खालापूर तालुक्यापासून १८ किमी अंतरावर उत्तरेला व चौक बाजारपेठेच्या उत्तरेला हे गाव आहे. हे महसुली गाव व ग्रामपंचायतीच्या ठिकाणाचे गाव आहे. दक्षिणेकडे चौक बाजारपेठ आहे. बोरगावच्या पूर्वेला माथेरान हे थंड हवेचे ठिकाण तसेच तीनघर ठाकूरवाडी व उत्तरेला वडविहीर (कोयना) तसेच आंबेवाडी, टेपाची वाडी, चिंचमाळ, बुरुजवाडी, सोंडेवाडी या वाड्या असून त्या गावात समाविष्ट आहेत. मोर्बे धरण प्रकल्पातर्गत गावाचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे शेती राहिली नाही. डोंगरउतारावर थोडीशी शेती होते. गावात डांबरी रस्ता, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा इ. सोयी आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]