राजीव दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव दीक्षित
जन्म राजीव
३० नोव्हेंबर इ.स. १९६७
प्रयागराज, उत्तरप्रदेश
मृत्यू ३० नोव्हेंबर, २०१० (वय ४३)
भिलाई, भारत
मृत्यूचे कारण हृदयविकार
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
टोपणनावे राजीव भाई
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
पेशा समाजसेवक
कारकिर्दीचा काळ १९९९ ते २०१०
प्रसिद्ध कामे स्वदेशी चळवळ / आजादी बचाओ आंदोलन / भारत स्वाभिमान आंदोलन
राजकीय पक्ष आजादी बचाओ आंदोलन / भारत स्वाभिमान आंदोलन
धर्म हिंदू
जोडीदार अविवाहित
वडील राधेश्याम
संकेतस्थळ
राजीव दीक्षित

राजीव दीक्षित हे एक भारतीय समाजसेवक होते. त्यांनी "स्वदेशी चळवळ" बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांंबद्दल जनमानसांत प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. ते "भारतीय स्वाभिमान आंदोलन"चे संस्थापक म्हणून ओळखले जातात.

दिक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. ते स्वदेशी जागरणकर्ता होते.

आयुष्य[संपादन]

दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर इ.स. १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाह गावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एम.टेक.ची पदवी आय.आय.टी कानपूरमधून प्राप्त केली, आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशासाठी व्यतीत केले.

स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील याची परिपूर्ण काळजी घेतली होती. भारताचा काळा पैसा विदेशी बँकामध्ये अनधिकृतरीत्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले.

उल्लेखनीय कार्य[संपादन]

  • भारतीयांनी गैर मार्गाने मिळवून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या सर्व काळ्या पैशाची माहिती उघड व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
  • स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले.
  • ते २० वर्ष व्याख्यान देत देशभर फिरले.

अचानक मृत्यू[संपादन]

भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौऱ्यावर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरित्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे.

संदर्भ[संपादन]