Jump to content

राजाभाऊ वाजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजाभाऊ प्रकाश वाजे (जन्म १९६५) हे सिन्नर, नाशिक जिल्ह्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. ते १८व्या लोकसभेचे सदस्य आहेत.[] उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सदस्य म्हणून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघातून १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.[][] ते एका राजकीय कुटुंबातील असून त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे सिन्नर १९६५-६७ चे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. त्यांच्या आजी मथुराबाई वाजे या १९५३ मध्ये मुंबई राज्यातील सिन्नर (नगर परिषद) च्या पहिल्या महिला महापौर होत्या. संयुक्त महाराष्ट्र चालवळीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तुरुंगवास भोगला. त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी सिन्नर (विधानसभा मतदारसंघ) मधून २००९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही लढवली होती.[]

भूषवलेली पदे

[संपादन]
  • २०१४: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले
  • २०१४: पंचायत राज समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड
  • २०१४: ग्रहक संरक्षक परिषद, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.
  • २०१७: अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.
  • २०१७: अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Result of Nashik loksabha 2024". Election Commission of India.
  2. ^ "Shiv Sena MLAs 2014". 2015-09-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Sitting and previous MLAs from Sinnar Assembly Constituency".
  4. ^ "रोज गाईची धार काढणारे आमदार राजाभाऊ वाजे". www.sarkarnama.in (इंग्रजी भाषेत). 2018-04-06 रोजी पाहिले.