रशिया–जपान युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशिया–जपान युद्ध

दिनांक ८ फेब्रुवारी १९०४ — ५ सप्टेंबर १९०५
स्थान मांचुरिया, पिवळा समुद्र, कोरियन द्वीपकल्प
परिणती जपानचा विजय
युद्धमान पक्ष
जपान
पाठिंबा:
Flag of the United States अमेरिका
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र ध्वज युनायटेड किंग्डम
रशिया रशिया
माँटेनिग्रो
सर्बिया
पाठिंबा:
फ्रान्स फ्रान्स
जर्मनी
सेनापती
सम्राट मैजी रशिया निकोलस दुसरा
सैन्यबळ
३-५ लाख ५-१० लाख

रशिया–जपान युद्ध विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशियाजपान ह्या राष्ट्रांदरम्यान लढले गेले. प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये लढल्या गेलेल्या ह्या युद्धासाठी ह्या दोन्ही देशांची साम्राज्यवादी धोरणे कारणीभूत होती. ह्या युद्धादरम्यान झालेल्या अनेक लढायांमध्ये जपानने रशियाचा निर्णायक पराभव केला व जागतिक स्तरावर आपले नाव प्रस्थापित केले. एका आशियाई देशाने युरोपीय देशावर विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

रशियन साम्राज्याला त्याच्या आरमारासाठी व जलवाहतूकीसाठी प्रशांत महासागरावर बारमाही उबदार पाणी असलेले बंदर हवे होते. व्लादिवोस्तॉक हे रशियन बंदर हिवाळ्यात समुद्राचे पाणी गोठल्यामुळे वापरता येत नसे. १८९५ सालच्या पहिल्या चीन–जपान युद्धामध्ये निर्णायक विजय मिळवल्यानंतर जपानी साम्राज्याने चीनच्या लायोडाँग द्वीपकल्पावर कब्जा मिळवला होता तसेच कोरियामधील चोसून राजतंत्राला उलथवून लावून कोरियादेखील गिळंकृत केला होता. परंतु १८९७ साली जपानला युरोपीय महासत्तांच्या दडपणाखाली लायोडाँग द्वीपकल्प सोडणे भाग पडले. रशियाने त्वरित ह्या भूभागावर ताबा मिळवून येथील पिवळ्या समुद्रावरील बंदरामध्ये आपले आरमार पाठवले. १९०३ सालापर्यंत रशियन लष्कराने मांचुरियाचा मोठा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता व कोरियाच्या उत्तर भागात मोठ्या संख्येने सैन्य ठेवले होते. जपानने रशियाच्या वाढत्या आगळीकीला घाबरून रशियासोबत वाटाघाटी सुरू केल्या. परंतु ह्या वाटाघाटींना यश न आल्यामुळे जपानी सम्राट मैजीने ८ फेब्रुवारी १९०४ रोजी रशियासोबत युद्धाची घोषणा केली. जपानी सैन्यक्षमता रशियाच्या तुलनेत कमी असली तरीही जपानी युद्धनीती व डावपेचांपुढे रशियाला अनेक लढायांमध्ये पराभव पत्कारावा लागला. जपानने साखालिन बेटासह अनेक रशियन भूभागवर कब्जा मिळवला. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट ह्यांच्या मध्यस्थीखाली मेनच्या पोर्टस्मथ येथे ५ सप्टेंबर १९०५ रोजी रशिया व जपानदरम्यान तह झाला व हे युद्ध संपुष्टात आले. ह्या मध्यस्थीसाठी रूझवेल्टला नोबेल शांतता पारितोषिक मिळाले.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]