रतनगुंज
रतनगुंज
रतनगुंज, वालगुंज
शिस्तबद्ध वाढणाऱ्या झाडांच्या घोळक्यात ज्याच्या बेशिस्त वाढीमुळे ओळखता येईल असे झाड म्हणजे रतनगुंज. एक झाड दुसऱ्यासारखं दिसत नाही. कोणाचेही लक्ष वेधून घेण्यासारखे या वृक्षात तसे काहीच नाही. या झाडाच्या लाल चुटूक गुंज बिया जेव्हा झाडाखाली पडलेल्या असतात तेव्हा कोणीही वाकून त्या उचलतोच. चीन मलायाचा हा मूळ रहिवासी वृक्ष. भारतात कुठेच आढळत नाही. जे काही वृक्ष आहेत, ते बागेत किंवा रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. साधारणत: ३० ते ५० फुट उंच वाढणारा हा वृक्ष. पाने संयुक्त, फुले लंब तुऱ्यात सोनेरी रंगाची, फारशी आकर्षक नसलेली. लांब चपट्या शेंगा घोसात येतात. त्या बियांच्या जागी टपोऱ्या व इतर ठिकाणी चपट असतात. शेंगा सुकल्यावर गुंडाळल्या जातात आणि त्यातील बिया काही काळ तशाच राहून मग खाली पडतात. झाडाचे लाकूड टणक असते आणि गाभा लालसर रंगाचा असतो. म्हणून त्याला लाल चंदन म्हणून संबोधले जाते. खऱ्या रक्तचंदनात भेसळ करण्यासाठी कधी कधी याचा उपयोग केला जातो. जिजामाता उद्यान, सागर उपवन, हॅंगिंग गार्डन या ठिकाणी हा वृक्ष आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे मुंबई येथे मेयो रोडवरील विज्ञान संस्थेच्या कोपऱ्यात एक झाड आहे.
संदर्भ
[संपादन]वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक ठाणे येथे वसंत विहार हायस्कूलच्या जवळ देखील हे झाड आहे.
अंधेरी एम.आय.डी.सी. सिप्झ येथील लेक गार्डन मधे देखील हे झाड आहे.