रझिया सुल्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रझिया सुलतान या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

रझिया सुल्ताना (इ.स. १२०५- इ.स. १२४०) ही दिल्लीचा सुल्तान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.

सुल्ताना[संपादन]

रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती. मुस्लिम राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडं मोडून काढून दिल्ली सल्तनतीवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

माध्यमात[संपादन]