यू.एस. एरवेझ
![]() | ||||
| ||||
स्थापना | १९३७ | |||
---|---|---|---|---|
मुख्य शहरे |
शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर |
Dividend Miles (1997-2015) AAdvantage (2015-) | |||
अलायन्स |
स्टार अलायन्स (२००४-२०१४) वनवर्ल्ड (सहकारी: २०१४-) | |||
विमान संख्या | ३३८ | |||
गंतव्यस्थाने | १९३ | |||
ब्रीदवाक्य | Fly with US | |||
पालक कंपनी | अमेरिकन एअरलाइन्स | |||
मुख्यालय | फोर्ट वर्थ, टेक्सास |
यू.एस. एअरवेज ही अमेरिका देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये अमेरिकन एरलाइन्स व यू.एस. एअरवेज ह्यांचे एकत्रीकरण होऊन जगातील सर्वात मोठ्या विमानकंपनीची स्थापना केली गेली. एकत्रित विमानकंपनी अमेरिकन एरलाइन्स ह्याच नावाने कार्यभार चालवेल. ८ एप्रिल २०१५ रोजी दोन्ही कंपन्यांचे अधिकृतपणे एकत्रीकरण पूर्ण झाले.
यूएस एयरवेज ही पूर्वी यूएस एयर मुख्य एयरलाइन म्हणून ओळखली जात होती. ती अमेरिकन फेडरल एविएशन ॲडमिनिष्ट्रेशनने यूएस एयरलाइन आणि अमेरिकन एयरलाइनना ८ एप्रिल २०१५ रोजी सिंगल ऑपरेटिंग सर्टिफिकेट(SOC) दिल्यानंतर बंद झाली. या दोन्हीची आरक्षण पद्दत आणि बुकिंग पद्दत दि. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी या विमान सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रीकरण विचारात घेतले तरीसुद्दा इतर बाबी त्या क्षणांपर्यंत जशाच्या तशाच राहिल्या. यांची विमान सेवा आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशीय अशा दोन्ही ठिकाणी विशालकाय दूरवर पसरलेली आहे त्यात उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,यूरोप,मध्य पूर्व या खंडातील २४ देशातील १९३ आगमन ठिकाणांचा यात समावेश आहे. मार्च २०१४ मध्ये या एयरलाइनने “वनवर्ल्डची” सभासद झाली तत्पूर्वी ही स्टार अलायन्सची सभासद होती.[१] ही एयरलाइन व्यवसायासाठी ३४३ जातीचे मेनलाइन जेट विमान, तसेच २७८ रिजिनल जेट,आणि टूर्बो प्रोप विमान करार पद्दतीने वापरते. सहाय्यक एयरलाइन यूएस एयरवेज एक्सप्रेस व्हाया कोड शेरिंग करारावर वापरतात.
इतिहास[संपादन]
यूएस एयरवेज विमान कंपनीची स्थापना दू फॉन्ट फॅमिली मधील रिचर्ड सी.दू फॉन्ट, आणि आलेक्षीस फेलीक्ष्दु फॉन्ट, जुनीयर या दोघा बंधूंनी आणि स्टेवण गार्डनर या सीईओ यांनी केली आहे असे ऑल अमेरिकन एविएशन या इतिहासात सापडले आहे. यांचे मुख्य कार्यालय पिट्सबर्ग येथे होते. सन १९३९ मध्ये ही कंपनी ओहीओ रिव्हर व्हॅली मध्ये काम करत होती. सन १९४९ मध्ये या कंपनीने तिचे नाव अमेरिकन एयरवेज असे बदलले आणि त्यांनी टपाल सेवा बंद करून प्रवाशी सेवा सुरू केली. आणि ही सन १९५३ मध्ये अल्लेघेणी एयरलाइन्स झाली.[२] सन १९७० मध्ये प्रवाश्यांच्या नाराजीमुळे या कंपनीचे निक नेम अगोणी एयर झाले.
घोषवाक्य[संपादन]
या विमान कंपनीची विविध घोषवाक्ये त्या त्या परिस्थितीत तयार झाली ती खालील प्रमाणे आहेत.
- यूएस एयर – “यूएस.एयरने अमेरिकेकडे उड्डाण करा”
- यूएस एयर-(१९८० शेवटी) “तुमची निवड यूएस एयर”
- पीएसए आणि यूएस एयर-(१९८० शेवटी) “आता आम्ही खूप खूप खुश झालो”
- यूएस एयर-(१९९० सुरुवातीला) “आपल्यासाठी यूएस एयर”
- यूएस एयर-(१९९० मध्यंतर) “यूएस एयरचा झेंडा फडकवा उंच”
- यूएस एयर-(१९९० मध्यंतरी) “रिकाम्या वेळात यूएस एयरने करा उड्डाण”
- यूएस एयर- (२००० सुरुवातीला) “झेंडा कोठे फडकावू मी”
- यूएस एयर-(९/११ नंतर) “प्रवास निवड आपली”
- यूएस एयर-(पहिल्या दिवाळखोरीत) “एकत्रित उड्डाण करूया”
- यूएस एयर-(पहिल्या दिवाळखोरीनंतर) “समोरील स्वच्छ आकाश”
- यूएस एयर-(पच्चीम अमेरिकेचे एकत्रीकरण झाल्यानंतर) “आमचे सोबत उड्डाण करा”
- यूएस एयर-(युएस एयरलाइनचे एकत्रीकरण झाल्यानंतर) “एत आहे नवीन अमेरिकन”
कायदेशीर करार[संपादन]
जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी कायदेशीर करार झालेले आहेत.[३]
- एयरबर्लिन
- अमेरिकन एयरलाइन्स(एकत्रित भागीदारी)
- ब्रिटिश एयरवेज
- फीनएयर
- हवाईयन एयरलाइन्स
- इबेरीय
- कतार एयरवेज
- रोयल जोर्दनियन
- टाम एयरलाइन्स
विशिष्टता[संपादन]
यूरोप, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका या दूरच्या प्रवासासाठी विमानात तीन प्रकारची व्यवस्था आहे.[४] एयर बस A300-200 आणि A330-300s मध्ये आसन व्यवस्थेचा आकार 1-2-1 हा हेरिंग माशाचे सापल्यासारखा आहे. ही आसन व्यवस्था प्रवाश्यांना अतिशय लाभदायक आहे.[५]आंतरराष्ट्रीय बोइंग 757-200s या विमानातील १६५ अंश कोणात बसविलेली आसन व्यवस्था देखील प्रवाश्यांना अतिशय समाधान देते. सर्व विमानात खानपान, मदिरा व्यवस्था मोफत उपलब्ध आहे.
सन २०१५ मध्ये अमेरिकन एयरलाइन्सचे आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील कॅनडा मेक्सिको, करेबियन, आणि मध्य अमेरिकेत जाणाऱ्या विमानातील प्रीमियन केबिनला व्यवसाय वर्ग म्हणून संबोधिले आहे.
केबिन[संपादन]
प्रथम वर्ग[संपादन]
५० आसन व्यवस्थेपेक्षा जादा व्यवस्था असणाऱ्या अंतरदेशीय विमाने तसेच यूएस एयरवेज एक्सप्रेस विमानात प्रीमियम केबिन व्यवस्था आहे. तेथे आरामदायक आसन व्यवस्था आहे. तसेच सर्व विमानात वाइन, बीयर,दारू, अल्पोप आहार, मोफत दिला जातो. जी विमाने २.५ तासापेक्षा जादा वेळ उड्डाण करतात त्यात जेवण, गरम कपडे दिले जातात.
मुख्य केबिन[संपादन]
सर्व विमानात आरामदायक आसनव्यवस्थेसह मुख्य केबिन आहे. जी आंतरदेशीय विमाने ३.५ तास किंवा त्यापेक्षा जादा प्रवास करतात त्या विमानातील प्रवाशी विमानात पूर्ण जेवण खरेदी करू शकतात.तसेच त्यापेक्षा कमी प्रवासातील प्रवाशांना अल्पोप अहार बॉक्स मिळू शकते. मद्य विकत मिळू शकते. चहा/कॉफी, थंडपेय मोफत मिळते. Transatlantic आणि दक्षिण अमेरिकन विमानात उच्च प्रतीचे जेवण, मदिरा, वाइन,मोफत आहे. खरेदी करून मदिरेसह प्रीमियन जेवण खरेदीने उपलब्ध आहे.[६]
संदर्भ[संपादन]
- ^ "यूएस एयरवेज टू जॉईन वनवर्ल्ड ऑन 31 मार्च 2014".
- ^ "यूएस एयरवेज".
- ^ "यूएस एयरवेज - कोडशेअर पार्टनर्स". Archived from the original on 2011-09-29. 2017-03-03 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "यूएस एयरवेज कॉंनेक्टिव्हिटी ॲंड फ्लीट इन्फॉर्मशन". Archived from the original on 2016-05-16. 2017-03-03 रोजी पाहिले.
- ^ "यूएस एयरवेज फलिट्स ॲंड सीट्स".
- ^ "फूड ॲंड बेव्हरेजेस". Archived from the original on 2008-10-11. 2017-03-03 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)