Jump to content

ज्यू लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यहुदी लोक या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रसिद्ध ज्यू व्यक्तींचे कोलाजचित्र. सव्य पद्धतीने: अल्बर्ट आइनस्टाइन, मोशे बेन मायमोन, गोल्डा मायर, एमा लाझारस.

ज्यू (ज्यूईश) किंवा यहुदी (हिब्रू: יְהוּדִים , येहूदिम ) हे ज्यू धर्मीय लोक आहेत. त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले[ संदर्भ हवा ]. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी सैन्याद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले तेव्हा जगभरातील १ कोटी ७० लाख ज्यू लोकसंख्या ही १ कोटी १० लाखावर आली होती.

इस्राएली लोकांना ज्यू , यहुदी, हिब्रू किंवा इस्राएली या नावानेही ओळखले जाते. अब्राहाम हा या लोकांचा आदिपुरुष समजला जातो. तो खल्डियातील (आताचे इराक) ऊर या गावचा रहिवासी होता. ऊर म्हणजे सध्याच्या दक्षिण इराकमधील तेल एल मुकायार हे शहर होय. तेथून निघून अब्राहाम मेसोपोटेमियातील हारान येथे आला. आणि तेथून तो कनान म्हणजे आजच्या इस्राएल या सुपीक प्रदेशात आला. त्या ठिकाणी त्या वेळी कनांनी लोकांची वस्ती होती.

देशनिहाय लोकसंख्या

[संपादन]

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.[]

भारत देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो. या ५००० लोकांपैकी जवळपास २७०० लोक मुंबईव कोकणात आहेत. इस्रायलच्या निर्मितीनंतर बरेच भारतीय ज्यू तिकडे निघून गेल्याने आता त्यांची भारतातील संख्या अत्यल्प झाली आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "द ज्यूइश पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड (२०१०) (ज्यूंची जगभरातील लोकसंख्या (इ.स. २०१०))". ज्युइश व्हर्च्युअल लायब्ररी (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: