Jump to content

तोराह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोराह

तोराह ज्यू (यहुदी ) धर्माचा धर्मग्रंथ आहे. बायबल मधील पहिला भाग म्हणजे जुना करार होय. या जुन्या करारातील ३९ पुस्तके म्हणजे यहुदी लोकांचा धर्मग्रंथ होय. त्याला तानक असे म्हणतात. या धर्मग्रंथाचे तीन विभाग आहेत.

१. तोराह (ग्रंथपंचक किंवा नियमशास्त्र) : या विभागातील पहिल्या पाच पुस्तकांना तोराह असे म्हणतात. ती पुस्तके अशी : १ उत्पत्ती २. निर्गम ३. लेवीय ४. गणना ५. अनुवाद

२. नबीईम (संदेष्ट्यांची पुस्तके) : संदेश्ट्यांची २२ पुस्तके या विभागात मोडतात.

३. खतूविम (पवित्र लेख) : उरलेली एकूण १२ पुस्तके या विभागात समाविष्ट आहेत.

•तानक हा शब्द हिब्रू बायबलसाठी (जुना करार) वापरला जातो. (यहुदी बायबल).

•हिब्रू बायबलचे (जुन्या कराराचे) तीन मुख्य विभाग आहेत.

•ग्रंथपंचक (तोराह – TORAH)- पहिली ५ पुस्तके

•संदेष्ट्यांचे ग्रंथ (नबीईम – NEBIIM) – २२ पुस्तके

•पवित्र लेख (खतुविम – KETHUBIM)- १२ पुस्तके

•वरील तीनही ग्रंथांची आद्याक्षरे मिळून तानक हा शब्द हिब्रू बायबलसाठी वापरला जातो. हिब्रु बायबलमध्ये एकूण ३९ पुस्तके आहेत.