Jump to content

ज्यू धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यहुदी धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्यू धर्मामधील प्रमुख चिन्हे व प्रतिके

ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म (इंग्लिश: Judaism; हिब्रू: יהדות) हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा धर्म अनुसरणाऱ्या व्यक्तींना ‘ज्यू’ किंवा यहूदी असे संबोधण्यात येते. ज्यू धर्माची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो. २०१० नुसार, जगामध्ये १.४३ कोटी लोक ज्यू धर्माचे अनुयायी आहेत, व त्यांचे जागतिक लोकसंख्येतील प्रमाण ०.२% आहे.[] जगातील ४१.१% ज्यू हे अमेरिकेत तर ४०.५% ज्यू हे इस्राईल मध्ये राहतात. इस्रायलमध्ये ७६% ज्यू असून, ज्यू धर्म हा या देशाचा राज्य धर्म (अधिकृत धर्म) आहे.

तनाख (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे (तोराह, नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. सिनेगॉग हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून रॅबाय हा ज्यू धर्मोपदेशक आहे. चानुका ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.

ज्यू लोकांच्या चळवळीला ज्यूवाद तर ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणाऱ्या तत्त्वाला ज्यूविरोध (ॲंटीसेमेटिझम) असे संबोधतात. जो धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात भारतामध्ये केरळमधील कोचीन येथे आले असावेत ज्यूधर्माला यहुदी धर्म असेही म्हणले जाते देव एकच आहे असे ज्यू धर्मीय लोक म्हणतात धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता त्याचप्रमाणे दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे त्यांच्या प्रार्थना स्थळांना सेनेगाँग असे म्हणतात.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ http://www.pewforum.org/2012/12/18/global-religious-landscape-jew/