यदु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णु, भागवतगरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. सहस्रजित्, क्रोष्टु, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.