मोहम्मद अली जिना
(मोहम्मद अली जिन्ना या पानावरून पुनर्निर्देशित)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ - सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.