पाकिस्तानाचे गव्हर्नर जनरल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाकिस्तानाचे गव्हर्नर जनरल हे १९४७ ते १९५६ सालांदरम्यान पाकिस्तानात ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी व शासनप्रमुख होते. १९५६ साली पाकिस्तान प्रजासत्ताक बनल्यावर 'गव्हर्नर जनरल' पद बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्राध्यक्ष हे पद निर्मिण्यात आले.

पदारूढ अधिकाऱ्यांची यादी[संपादन]

नाव व्यक्तिचित्र कार्यकाळाचा आरंभ
(इ.स. दिनांकांनुसार)
कार्यकाळाची अखेर
(इ.स. दिनांकांनुसार)
जीवनकाळ
(इ.स. दिनांकांनुसार)
राजकीय पक्ष
मुहम्मद अली जिना १५ ऑगस्ट, १९४७ ११ सप्टेंबर, १९४८ २५ डिसेंबर, १८७६ – ११ सप्टेंबर, १९४८ मुस्लिम लीग
ख्वाजा नझिमुद्दीन १४ सप्टेंबर, १९४८ १७ ऑक्टोबर, १९५१ १९ जुलै, १८९४ - २२ ऑक्टोबर, १९६४ मुस्लिम लीग
मलिक गुलाम मोहम्मद १७ ऑक्टोबर, १९५१ ६ ऑक्टोबर, १९५५ २० एप्रिल, १८९५ - १२ सप्टेंबर, १९५६ कोणताही नाही
इस्कंदर मिर्झा ६ ऑक्टोबर, १९५५ २३ मार्च, १९५६ १३ नोव्हेंबर, १८९९ - १२ नोव्हेंबर, १९६९ रिपब्लिकन पक्ष