चर्चा:मोहम्मद अली जिना
Appearance
Jinnah हा इंग्रजीत लिहिलेला शब्द मराठीत जिना असा लिहितात. इंग्रजी शब्दात जॆव्हा एखाद्या अक्षराचे द्वित्त होते तॆव्हा ते जोडाक्षरासारखे लिहायचे किंवा उच्चारायचे नसते. उदा० Cuttingचा उच्चार कट्टिंग असा होत नाही. अक्षराचॆ द्वित्त हे अॅक्सॆंट दाखवण्यासाठी करतात. हा शब्द टीचॆ द्वित्त न करता Cuting असा लिहिला तर त्या शब्दाचा उच्चार क्यूटिंग होईल. तसे न होण्यासठी द्वित्त करावेच लागते.
इंग्रजीतली y, w, r, l, h ही अक्षरे उच्चारातले दीर्घीकरण सुचवतात. उदा० Honey, Hawk, Warm, Talk, Jinnah यांचे उच्चार अनुक्रमे हनीऽ, हाॅऽक, वाॅऽम, टाॅऽक, जिनाऽ वगैरे. .... ज (चर्चा) १५:१८, १ नोव्हेंबर २०१६ (IST)