Jump to content

मोठा टिलवा (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोठा टिलवा
कुडावळ

मोठा टिलवा, कुडावळ किंवा उचाट (इंग्लिश:Avocet; हिंदी:कस्या चहा, कुसिचाहा, कुसिआ चहा, लालगोडी) हा एक पक्षी आहे.

आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असतो.पांढऱ्या व काळ्या रंगांचा सुबक,सुंदर जलचर पक्षी.पिसे नसलेले लांब निळे पाय.लांब,बारीक चोचीचा पुढील टोकाचा बाक वरच्या बाजूला.मधुर व सुस्पष्ट आवाज.

वितरण

[संपादन]

पाकिस्तान,वायव्य भारत,क्वचित पूर्व नेपाळ,आसाम आणि मणिपूर,दक्षिणेकडे तामिळनाडू,महाराष्ट्रातील समुद्रकिनारा ह्या भागांत हिवाळी पाहुणे.श्रीलंकेत भटके पक्षी दिसतात. उ.बलुचिस्तान या भागात एप्रिलमध्ये वीण.

निवासस्थाने

[संपादन]

चिखलाणी आणि दलदली.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली