Jump to content

मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे
प्रकार द्रुतगती रेल्वे
प्रदेश रशिया
कधी खुला इ.स. १८५१
मालक रशियन रेल्वे
चालक ऑक्टोबर रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ६५० किमी (४०४ मैल)
गेज १५२० मिमी रशियन गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग २५० किमी/तास

मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे (रशियन: Железнодорожная линия Санкт-Петербург — Москва) हा रशिया देशामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. ६५० किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग रशियाची राजधानी मॉस्कोला दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गसोबत जोडतो. रशियन साम्राज्याचा झार पहिला निकोलस ह्याच्या आदेशानुसार मॉस्को-लेनिनग्राड रेल्वेमार्गाचे बांघकाम १८४२ मध्ये सुरू झाले व १ नोव्हेंबर १८५१ रोजी ह्या मार्गावरील पहिली रेल्वेगाडी धावली.

प्रवासी संख्येच्या दृष्टीने मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग मार्ग रशियातील सर्वात वर्दळीचा असून ह्या मार्गावर दररोज सुमारे ३२ गाड्या धावतात. सीमेन्स ह्या जर्मन कंपनीने बनवलेली २५० किमी/तास इतक्या वेगाने धावणारी द्रुतगती रेल्वेगाडी ह्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे असून ती मॉस्को ते सेंट पीतर्सबर्गदरम्यानचे अंतर ३ तास व ३० मिनिटांत पूर्ण करते.

प्रमुख शहरे[संपादन]

हा रेल्वेमार्ग रशियाच्या लेनिनग्राद ओब्लास्त, नॉवगोरोद ओब्लास्त, त्वेर ओब्लास्तमॉस्को ओब्लास्त ह्या चार प्रांतांमधून धावतो.

बाह्य दुवे[संपादन]