रशियन रेल्वे
Appearance
रशियन रेल्वे | |
उद्योग क्षेत्र | दळणवळण |
---|---|
स्थापना | इ.स. १९९२ |
मुख्यालय | मॉस्को, रशिया |
सेवांतर्गत प्रदेश | रशिया |
सेवा | रेल्वे प्रवासी, मालवाहतूक व संलग्न सेवा |
कर्मचारी | ९,५०,००० |
संकेतस्थळ | Russian Railways |
रशियन रेल्वे (संक्षेप:RZhD, रशियन: Российские железные дороги (РЖД)) ही रशियाची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे वाहतूक कंपनी आहे. रशियन रेल्वेची एकूण लांबी ८६,००० किमी आहे. रशियात या रेल्वेसेवेची मक्तेदारी आहे. रशियन रेल्वेची स्थापना १९९२ साली सोव्हिएत संघाच्या अस्तानंतर झाली.
सायबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब धावणारी रेल्वेगाडी रशियन रेल्वेचीच एक सेवा आहे. रशियन रेल्वेच्या सर्व गाड्या रशियन गेजवर धावतात.
बाह्य दुवे
[संपादन]- [https://web.archive.org/web/20110414090117/http://eng.rzd.ru/ Archived 2011-04-14 at the Wayback Machine. अधिकृत संकेतस्थळ