मैतेई संकीर्तन परंपरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नृत्य

मैतेई संकीर्तन परंपरा ही मणिपूर राज्यातील एक धार्मिक परंपरा आहे.यालाच मैतेई नट संकीर्तन किंवा मणिपुरी संकीर्तन असे म्हंटले जाते. नृत्य, नाट्य, संगीत यांचा एकत्र आविष्कार असलेली हे एक धार्मिक परंपरा आहे. भारत देशाच्या मणिपूर राज्यातील मंदिरात विशेषकरून याचे सादरीकरण केले जाते. कृष्ण या देवतेशी संबंधित कथा या कला प्रकारात सादर केल्या जातात. मणिपूर परिसर तसेच मणिपूरजवळील त्रिपुरा, आसाम येथील वैष्णव परंपरेतील भक्तगण ही कला सादर करतात. युनेस्को वारसा यादीत या परंपरेला स्थान देण्यात आलेले आहे.[१]

वैशिष्ट्ये[संपादन]

वादन

संकीर्तन परंपरेचा मणिपूर मधील स्थानिक नागरिकांवर धार्मिक आणि सांस्कृतिक परभाव आहे. मुख्यत्वेकरून मंदिरांमध्ये या कलेचे सादारीकरण केले जाते तथापि कुटुंबातील धार्मिक कृत्यातही याचा समावेश होतो. नृत्य आणि संगीत यांच्या माध्यमातून कृष्णकथा उलगडणे हे याचे विशिष्ट्य म्हणून सांगता येते.

स्वरूप[संपादन]

मंदिरालगत असलेल्या अंगणात मंडप तयार करून तेथे या कलेची प्रस्तुती केली जाते. मणिपूर परिसरात नट पाल नावाच्या प्रकाराचे सादरीकरण केले जाते. विशेषतः अरीबा पाल आणि मनोहर पला प्रकार हे केवळ मंदिरातच सादर केले जातात. धार्मिक स्थलाखेरीज बाहेरच्या समाजात होळी उत्सवा प्रसंगी होळी पाल सारखी प्रस्तुती केली जाते. पावसाळ्याच्या काळात ,मंदिरात रथयात्रा काढली जाते आणि कला प्रस्तुती होते. कुटुंबात जन्म, विवाह, मृत्यू अशा निमित्ताने संकीर्तन केले जाते. मुलाचे आणि मुलीचे कान टोचले जातात त्या प्रसंगी संकीर्तन आयोजन होते. वैष्णव भक्तांसाठी मावी रूपात साकार होणारी कृष्णाची लीला असे याचे स्वरूप आहे.

विशेष दिवस म्हणून जाहीर[संपादन]

मृदुंग वादनाची एक पद्धती

संकीर्तन परंपरेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ४ डिसेंबर हा दिवस संकीर्तन दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.[२] मानवतेचा संदेश देणारा हा कलाप्रकार असल्याने त्याला हा विशेष आदर दिला गेला आहे.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "UNESCO - Sankirtana, ritual singing, drumming and dancing of Manipur". ich.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2023-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ Bureau, EastMojo News (2018-12-05). "Manipur observes day of inscription of Sankirtana on UNESCO list". EastMojo (इंग्रजी भाषेत). 2023-09-05 रोजी पाहिले.
  3. ^ Today, North East (2021-11-25). "Manipur : December 4 Declared As 'Sankirtan Day' To Honour 'Heritage Of Humanity'". Northeast Today (इंग्रजी भाषेत). 2023-09-05 रोजी पाहिले.