मॅरॅथॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बर्लिन मॅरॅथॉन मधील एक चित्र

मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा धावणे. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात.

इतिहास[संपादन]

प्राचीन काळी ग्रीस देशामधे मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते; तिथे एक लढाई झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथेन्सपर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२.१९५किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव 'मॅरॅथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या स्विकारले गेले. दुर्दैवाने हा स्पर्धक पूर्ण सैनिकी वेषात होता. अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार इत्यादी गोष्टी घेऊन धावला होता. यात अतिश्रम होऊन तो पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला.

स्पर्धा[संपादन]

आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. परंतू सुरूवातीच्या काळात स्पर्धेचे अंतर स्पर्धेनुसार बदलत राही. सध्याचे अंतर पूर्ण मेरेथोंचे ४२.१९५ किमी हे अंतर १९२१ सालापासून प्रमाणित गेले गेले. जगात, ही स्पर्धा ऑलिम्पिक व्यतिरिक्तही, जवळ जवळ ५०० हून अधिक ठिकाणी घेतली जाते. नागपूर,मुंबई, ठाणेपुणे येथेही ही स्पर्धा आयोजित केली जाते.

क्षमता[संपादन]

मुंबई येथे २००८ मध्ये झालेल्या स्पर्धेत धावणारे लोक

या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची क्षमता बणवणे आवश्यक असते.दररोज सराव करणं आवश्यक असतं.तसेच त्यात वेग नेमका ठेऊन शेवट पर्यंत थकवा न येणे आवशयक असते. शंभरवर्षीय क्रीडापटू फौजासिंग यांनी हाँगकाँग मध्ये १० किलोमीटर मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा एक तास बत्तीस मिनिटे व अट्ठावीस सेकंदात पूर्ण केली होती.

हे सुद्धा पहा[संपादन]