नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन ही नागपूर इथे आयोजीत केली जाणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन स्पर्धा आहे. ही स्पर्धा साधारणतः जानेवारी महिन्याच्या शेवट्याच्या आठवड्यात महात्मा गांधी पुण्यतिथीच्या (हुतात्मा दिन) आसपास अहिंसा दिवस आयोजन समितीद्वारा आयोजीत केली जाते. न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व नागपुरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी या समितीची स्थापना २००७ मध्ये केली होती. या स्पर्धेची सुरुवात इ.स. २००९ सालापासून करण्यात आली असून इ.स. २०१० हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. मी धावतो शांतता आणि अहिंसेच्या संस्कृतीसाठी हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे.
स्पर्धा
[संपादन]ही स्पर्धा पुढील गटांमध्ये भरवली जाते.[१]
- मॅरॅथॉन ४२.१९५ किमी
- अर्धमॅरेथॉन २१.०९७ किमी
- पुरूष खुली स्पर्धा १२ किमी
- महिला खुली स्पर्धा १० किमी
- १८ वर्षाखालील मुले ५ किमी
- १८ वर्षाखालील मुली ५ किमी
- व्हिलचेअर ३ किमी
- अहिंसा दौड ३ किमी
इ.स. २००९
[संपादन]इ.स. २००९ हे या स्पर्धेचे पहिले वर्ष होते. जानेवारी २९, २००९ रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुरूष विभागात इथिओपियाचा Adugnga Tola Gomeda तर स्त्री विभागात केन्याची Agnes Karunge Mutane हे विजयी ठरले होते.[२]
इ.स. २०१०
[संपादन]इ.स. २०१० हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. यावर्षी ही स्पर्धा जानेवारी ३१, २०१० रोजी आयोजीत केली आहे. या स्पर्धेत यावर्षी एकूण ३६,५६,६०० रुपये इतके बक्षीस ठेवण्यात आले आहे.[१]
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-01-25 at the Wayback Machine.
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Competition Details". 2010-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-10 रोजी पाहिले.
- ^ "Gomeda, Mutane lift नागपूर Marathon शीर्षकs".