मृणाल देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मृणाल देव
मृणाल देव
जन्म मृणाल देव
21 जून 1968
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अवंतिका, गुंतता हृदय हे
आई वीणा देव
पती रुचीर् कुलकर्णी
अपत्ये विराजस

मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहेत.मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी,प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात.त्या विख्यात साहित्यिक गो.नी.दांडेकरांच्या नात आहेत[१].

प्रारंभिक जीवन[संपादन]

अभिनयाची सुरुवात[संपादन]

त्यांनी अभिनयाची सुरुवात अल्पवयात मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेपासून केली.तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या.स्वामीमधे त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाईंची भूमिका साकारली.स्वामीमुळे त्याचं नाव घरोघरी पोचले. त्यानंतर त्यांनी श्रीकांत आणि द ग्रेट मराठा या मालिकाही केल्या.नंतर द्रौपदी,हसरते,मीराबाई,टीचर,खेल,स्पर्श,सोनपरी इ. मालिकांमधून त्यांचा सकस अभिनय बहरत गेला[२]. अल्फा मराठी वाहिनीवरील अवंतिका या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला फार वाहवा मिळाली.

चित्रपट प्रवास[संपादन]

त्यांनी विविधरंगी,बहुढंगी असे अनेक प्रकारचे मराठी तसेच हिंदी चित्रपट केले[३].त्यामध्ये ऐतिहासिक,सामाजिक,रोमान्स अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, कुछ मीठा हो जाये(२००५), बायो, रास्ता रोको, क्वेस्ट(२००६), देह, छोडो कल कि बाते(२०१२), रेनी डे, यलो(२०१४), प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं(२०१४), रमा माधव (२०१४)[४] असे काही चित्रपट वानगीदाखल सांगता येतील.

दूरदर्शन मालिका[संपादन]

स्वामी, श्रीकांत, द ग्रेट मराठा, द्रौपदी, हसरते, मीराबाई, टीचर, खेल, स्पर्श, सोनपरी, राजा शिव छत्रपती[५]

कौटुंबिक व खाजगी आयुष्य[संपादन]

प्रसिद्ध साहित्यिक गो.नी.दांडेकर हे त्यांचे आजोबा होत.साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. त्यांचे वडील डॉ.विजय देव पुण्यातील स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य होते.व्यवसायाने वकील असलेल्या श्री रुचिर कुलकर्णी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. http://www.justmarathi.com/mrinal-dev-kulkarni/
  2. http://www.marathimovieworld.com/artistprofile/mrinal-kulkarni-bio.php
  3. http://www.justmarathi.com/mrinal-dev-kulkarni/
  4. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Rama-Madhav-houseful/articleshow/43523893.cms
  5. http://www.imdb.com/title/tt2354568/