Jump to content

मुरलीधर सदाशिव जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुरलीधर सदाशिव जोशी
पूर्ण नावमुरलीधर सदाशिव जोशी
जन्म १९१२
सिन्नर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू फेब्रुवारी २९, २००१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, कलाअध्यापन
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)
वडील सदाशिव जोशी

ओळख[संपादन]

मुरलीधर सदाशिव जोशी (ऊर्फ 'एम्‌.एस्‌. जोशी'; जीवनकाल: १९१२ - फेब्रुवारी २९, २००१) हे 'ग्वाश' तंत्राने निसर्गचित्रे, नगरचित्रे रंगवण्याकरता नावाजलेले चित्रकार होते.

जीवन[संपादन]

एम्‌.एस्‌. जोशी यांचा जन्म १९१२ साली (तारीख हवी आहे.) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गावी झाला. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेतून त्यांनी चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेतले.

एम्‌.एस्‌. जोशी यांची चित्रनिर्मिती नगरचित्रे (cityscapes), निसर्गचित्रे (landscapes) प्रकारातील आहे. 'ग्वाश' तंत्राने जलरंग वापरून रंगवलेल्या त्यांच्या चित्रांत 'ग्वाश' तंत्रातील रंगांचा अपारदर्शकपणा आणि शुद्ध जलरंगांचा पारदर्शक ताजेपणा यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या चित्रांत जाणवतो.

चित्रनिर्मितीखेरीज एम्‌.एस्‌. जोशी यांनी कलाअध्यापनदेखील केले. मुंबईतील छबिलदास शाळेमध्ये ते चित्रकलाशिक्षक म्हणून काम करत होते. इ.स. १९३९ साली त्यांनी काही सहकाऱ्यांसमवेत मुंबईत दादर येथे 'मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट' या चित्रशिक्षणसंस्थेची स्थापना केली.

फेब्रुवारी २९, २००१ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

संदर्भ[संपादन]

[[वर्ग:इ.स. 21 november

१९१२ मधील जन्म|जोशी, मुरलीधर सदाशिव]]