Jump to content

मुंबई छशिमट−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस‎‎
दादर स्थानकावर थांबलेली दादर−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस

दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्यातील मडगांव शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबईच्या दादर व गोव्याच्या मडगांव ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते व ७५० किमी अंतर १० तास व ३० मिनिटांमध्ये पूर्ण करते.

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ही गाडीची वाहतूक संपूर्ण प्रवासामध्ये इलेक्ट्रिक इंजिन द्वारे जाते. ह्या गाडीत साधारणपणे केवळ बसायची सोय असलेले २ वातानुकुलीत डबे तर १० साधारण डबे असतात.

कोकण कन्या एक्सप्रेसमांडवी एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात.[]

तपशील

[संपादन]
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२०५१ दादर – मडगांव ०५:२५ १६:०० रोज
१२०५२ मडगांव – दादर १२:०० २३:०५ रोज
स्थानक क्रम स्थानक संकेत स्थानक/शहर अंतर
DR दादर
TNA ठाणे २५
PNVL पनवेल ६०
CHI चिपळूण ३१६
RN रत्‍नागिरी ४२२
KKW कणकवली ५७८
KUDL कुडाळ ६१७
THVM थिविम ६९२
MAO मडगांव ७५७

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Full Time-Table for Dadar - Madgaon Jan Shatabdi Express (PT)/12051: Dadar to Madgaon - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2019-01-19 रोजी पाहिले.